22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूर३ लाख ८८ हजार ४०० घरांवर अभिमानाने फडकणार तिरंगा

३ लाख ८८ हजार ४०० घरांवर अभिमानाने फडकणार तिरंगा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ८ ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवा अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा ही मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार ४०० घरांवर मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, स्वंयसेवा संस्था यांनी हर घर तिरंगा ही मोहिम उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून यशस्वी करतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, तालुक्यातील अधिकारी यांची आढावा बैठक दि. २८ जुलै रोजी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात घरे ३ लाख ८० हजार ८९१, प्राथमिक शाळा १ हजार ९११, माध्यमिक शाळा ६८३, जिल्हा परिषद १, पंचायत समिती १०, ग्रामपंचायत ७८४, अंगणवाडी केंद्र २ हजार ७२१, प्राथमिक उपकेंद २५२, प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) ४६, उपजिल्हा रुग्णालय २, रुग्णालये व दवाखाने ५१४, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी ७३४, असे जिल्ह्यात एकूण ३ लाख ८८ हजार ४०० ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विभागात मोठ्या सन्मानाने तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक नागरिकांनी तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे. तिरंगा फडकवितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. घरोघरी तिरंगा हा दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सांयकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांनी मात्र ध्वज संहिता पाळावी. तिरंगा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.

हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षित ठेवावा. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये. तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये. विविध स्तरातून सहकार्य मिळविण्यासाठी शाळा-कॉलेजेस, एनसीसी, एनएसएस, युवा मंडळ इत्यादी मधून तिरंगा वॉलेंटीयर्स म्हणून नियुक्त करावे. शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्याद्वारे ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस येथून विकत घेण्यात यावा. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, रोजगार सेवक, आशा आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थितीत गृहभेट आयोजित कराव्यात. ग्रामस्थांशी संवाद साधून घरोघरी तिरंगा उपक्रमाची माहिती द्यावी. तसेच नागरिकांना स्वयंस्फुर्तीने तिरंगा झेंडा खरेदी करणे, तिरंगा झेंडा उपलब्धता असलेले ठिकाण व तिरंगा संहितेची माहिती द्यावी. विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा पत्राचे वाचन करावे.

लोकसहभागातून ग्राम स्वच्छता मोहिम व ७५० वृक्षाची लागवड आयोजित करण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी, किशोरवयीन मुले-मुली, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष, ग्रामस्थ यांच्या सहभागने प्रभात फेरीचे आयोजन करावे. गावातील तरुणांच्या सहभागातून मशाल फेरीचे आयोजन करावे . तसेच गावांमध्ये देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, रांगोळी स्पर्धा, पथनाट्याचे अयोजन करावे . गावात शंभर टक्के घरोघरी तिरंगा फडकेल हे शासकीय यंत्रणानी पहावे. असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या