28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूर‘त्रिवेणी’ने जागवल्या सावरकर घराण्यातील स्त्रियांच्या आठवणी

‘त्रिवेणी’ने जागवल्या सावरकर घराण्यातील स्त्रियांच्या आठवणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नवनिर्माण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने विविध संस्थातर्फे आयोजित आणि अनुनाद कलाविष्कार संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘त्रिवेणी’ या कार्यक्रमाने सावरकर घराण्यातील स्त्रियांच्या त्यागाच्या आठवणी जाग्या केल्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दयानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. डॉ. ज्योत्सना कुकडे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक कमलाबाई चाकुरकर, संगीता सुधाकर शृंगारे, शोभा अभिमन्यू पवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. अनुजा कुळकर्णी, डॉ.स्मिता खानापुरे, वैभव देशमुख, रागिनी यादव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनिर्माण प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रविण सरदेशमुख यांनी केले.

प्रारंभी ‘सदया गनया हे सावरकरलिखित गणेश स्तवन नृत्य अविष्कारामध्ये सादर करण्यात आले. सावरकर यांच्या भूमिकेतील कलाकार आणि निवेदक यांनी त्यांच्या घराण्यातील स्त्रियांचा नाट्यरुप परिचय करुन दिला. सावरकर आणि माधवराव पेशवे यांच्यावर लिहिलेल्या फटक्याला नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. सावरकर लिखित नवपारिजातमाला या कवितेचे नृत्य सादरीकरण करण्यात आले. ‘ने मजसी परत मातृभूमीला’ हे काव्य नृत्य नाट्य स्वरूपात सादर करण्यात आले. या गीताच्या सादरीकरणानंतर संबंध सभागृह भावभोर होऊन स्तब्ध झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची लोकभावना सांगून गेले.

या दरम्यान नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून सावरकरांच्या आयुष्यातील प्रसंग उलगडत गेले. सावरकर यांच्या भूमिकेतील तेजस महाजन यांचे स्पष्ट शब्दोच्चार हा त्यांच्या भूमिकेतला प्राण.अत्यंत ताकदीने त्यांनी भूमिका सादर केली. येसूवहिनीच्या भूमिकेतील राजश्री पोहेकर कुलकर्णी यांनी येसूबाईची भूमिका जगत त्यांचे दु:ख अत्यंत संयतपणाने मांडले.
अमिता लेकुरवाळे यांनी सावरकरांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका एकरूप होत सादर केली.यमुनाबाई आणि येसूबाई यांच्यामधील काही प्रसंग, विशेषता दोघींनी परस्परांना अपत्य निधनाचे दु:ख सांगत असतानाच्या प्रसंगाने सबंध सभागृहाला रडायला लावलं. शांताबाईच्या भूमिकेतील नंदिनी जोशी यांनी आपल्या भूमिकेत प्राण ओतला.ताईंची धीटपणाची भूमिका उत्कृष्टपणे उभी केली.नचिकेत सोनार आणि निशांत पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या