शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील तुरीवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उभी तूर उभी वाळून गेली आहे परिणामी तुरीचे उत्पादन घटले असून उत्पन्नात कमालीची तुट झाल्यानेकिं्वटलचे उत्पादन किलोमध्ये निघत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचे दुष्टचक्र शेतक-यांची पाठ सोडायला तयार नसून अतिवृष्टी व पुरामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन हातचे गेले आहे तर अधिकचा पाऊस व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे मर रोगामुळे तुरीचे पीक ही हातचे गेल्याने लागवड खर्चही निघणे कठीण झाले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या शेतक-यांची पूर्ण भीस्त सोयाबीन नंतर तुरीवर आहे. हमखास उत्पादन देणारे व पैशाचे पीक म्हणून सोयाबीननंतर तुरीकडे पाहिले जाते.
गेल्या चार पाच वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करीत असतानाच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने वेळेत खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या. सुरुवातीला चांगली वाढही चांगली झाली मात्र नंतर सततच्या पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून उत्पादनात मोठी घट झाली आहे तर अनेक शेतक-यांची तूर कापणीविना तशीच उभी असल्याचे चित्र दिसत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन हातचे गेले त्यानंतर सततच्या पावसाने मर रोगामुळे तुरीचे उत्पादन धोक्यात आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तुरीचे तात्काळ पंचनामे करावेत शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी व विमा मंजूर करावा, अशी मागणी उत्पादक शेतक-यातून केली जात आहे.