25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरमुरुडच्या रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा

मुरुडच्या रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी मुरुड ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण, उपचार सुविधा, रेमडीसिविर इंजेक्शन, लॉकडाऊन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था यासह अन्य आवश्यक आरोग्य सेवा सुविधांचा पाहणी करून आज शुक्रवार दिनांक १६ एप्रिल रोजी आढावा घेतला आणि कोवीड-१९ प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुरुड येथील रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करा, अशी संबंधित यंत्रणेला पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

लातूर तालुक्यातील मुरुड आणि परीसरातील गावांमध्ये कोवीड-१९ प्रादूर्भाव सध्या वाढला आहे. मुरुड येथेच जवळपास २०४ रुग्ण उपचार घेत आहेत. मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड-१९ उपचार सुविधेचा आणि सर्व आरोग्य सेवांची पाहणी करुन पालकमंत्री देशमुख यांनी आढावा घेतला. मुरुड येथे पॉझिटिव्ह रेट जवळपास ३० ते ४० टक्केच्या घरात आहे. येथील कोवीडरुग्ण होम आयसोलेशनचे पालन करीत नसल्याने कोविड बाधितांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मुरुड येथील रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्यात यावे, सरकारी कोविड हॉस्पिटलसाठी शासकीय यंत्रणे बरोबर मुरुड मधील खाजगी डॉक्टर मंडळींना व पालिकेचे मनुष्यबळ सेवेत घ्यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्य विभागास पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परीषद सदस्य दिलीप नाडे, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, वैद्यकिय अधीक्षक डॉ. प्राची हरिदास, डॉ. हनुमानदास चांडक, डॉ. अर्चना चांडक, डॉ. दिनेश नवगिरे, दीपक पटाडे यांच्यासह मुरुड ग्रामीण रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, मुरुड येथील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

समाज कल्याणच्या कोविड सेंटरचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
कोविड-१९ बाधित रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या लातूर शहरानजीकच्या १२ नं. पाटी येथील समाज कल्याण विभागाचे एक हजार मुलांचे शासकीय वसतीगृह असलेल्या कोविड केअर सेंटरला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी भेट देऊन तेथील कोविड उपचार सुविधांचा आढावा घेतला. पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी येथील तेथील उपचार व्यवस्था, औषध व इतर साहित्याची उपलब्धता, मनुष्यबळ व इतर सोयी-सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी बेडची संख्यावाढवणे, तपासणी यंत्रणा सक्षम करणे, औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे, अंबुलन्स व्यवस्था सज्ज ठेवणे, स्वच्छतेबाबत दक्षता घेणे आदी सूचना यावेळी संबंधितांना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सुनील यादव, डॉ.शिल्पा शिंदे यांची उपस्थिती होती.

किराणा दुकानाच्या आडून गुटखा, तंबाखू विक्री जोरात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या