शिरूर अनंतपाळ :– तालुक्यातील तुरुकवाडी ग्रामपंचायत कर वसुलीत अव्वल आली असून विशेष कर वसुली दिनी बुधवारी ४ लाख ९६ हजाराची विक्रमी वसुली केली असून याबद्दल सरपंच हरिश्चंद्र कोतवाडे, ग्रामसेवक किशोर मुळे, उपसरपंच नुरबी शेख व सदस्यांचे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी कौतुक केले ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षाअखेर तुरूकवाडी ग्रामपंचायतची विक्रमी करवसुली झाली असून या करवसुलीत तुरुकवाडी शिरूर अनंतपाळ तालुक्यात अव्वल ठरला आहे. करवसुलीपैकी विशेष कर दिनी एकाच दिवशी ४ लाख ९६ हजार ४६० रुपयांची वसुली झाली आहे.
दरम्यान ग्रामपंचायतींना विविध चार प्रकारच्या करांमधून दरवर्षी उत्पन्न मिळत असते. या सर्व करांना मिळून ग्रामपंचायत कर म्हटले जाते. यामध्ये मालमत्ता कर, दिवाबत्ती कर, सामान्य आरोग्य रक्षण उपकर आणि सामान्य पाणीपट्टी या चार करांचा समावेश असतो. याशिवाय विशेष पाणीपट्टी कर हा वेगळा असतो. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणाऱ्या कुटुंबांना सामान्य पाणीपट्टी; तर नळ जोडणी घेतलेल्या कुटुंबांना विशेष पाणीपट्टी आकारण्यात येते. विशेष पाणीपट्टी हे सामान्य पाणीपट्टीपेक्षा तुलनेने अधिक असते.
कानेगाव ग्रामपंचायतीची १ लाख वसुली.
तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विशेष कर वसुली मोहिम राबविण्यात आली.यात नागरिकांतून मोठ्या प्रमाणात कर भरणा झाला आहे.या विशेष कर वसुलीत सरपंच ब्रम्हानंद शिवणगे, ग्रामसेवक संदिप शिरूरे व कर्मचाऱ्यांनी १ लाखाची करवसुली केली आहे. गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण,विस्तार अधिकारी पंचायत डी.बी.व्होट्टे यांनी सर्वांचे कौतुक केले.