24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरचोरीच्या चार दुचाकीसह दोघांना अटक

चोरीच्या चार दुचाकीसह दोघांना अटक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने चोरीच्या ४ मोटरसायकलसह २ आरोपींना अटक करत १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मलाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले होते.

दरम्यान पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचे तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथक करीत असताना गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करीम पाशा अमनजी शेख (वय ३५ रा. तुंगी, ता. औसा जि. लातूर), गणीपाशा अमनजी शेख (वय ३८ रा. तुंगी, ता. औसा जि. लातूर, सध्या रा. लाल बहादूर शास्त्री नगर लातूर) यांना स्क्रॅप मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील विविध भागातून अनेक मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी ४ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या