24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरनागेशवाडी, झरी (बु़) येथील दोघे कोरोना बाधित

नागेशवाडी, झरी (बु़) येथील दोघे कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

चाकूर : चाकूर तालुक्यातील नागेशवाडी येथील एक महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील झरी बुद्रुक येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझ्ाििटव्ह आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या
सहा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेची चिंता वाढली आहे. नागरिकांनी कोरोना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागेशवाडी येथील एका महिला आणि तिचा मुलगा अन्त्यविधीसाठी पुणे येथे गेले होते. ते तेथून परतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लातुरात त्यांचे स्रॅब तपासणीसाठी देण्यात आले, तेंव्हा सदर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर मुलाचा अहवाल निगेटीव्ह आला. तसेच झरी बु येथील एक व्यक्ती मुंबई येथे नोकरी सोडून आली होती, तिथे त्यास त्रास जाणवू लागला म्हणून गावाकडे आला होता. तो शेतात क्वारंनटाईन झाला होता. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नागेशवाडी येथील कोरोनाबाधीत रुग्णांवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर झरी बु येथील रुग्णांवर कोवीड सेंटर उदगीर येथे उपचार सुरू आहेत. नागेशवाडी येथील २५ व्यक्ती नां संस्थात्मक क्वारंनटाईन करण्यात आले आहे. तर झरी बु येथील ९ व्यक्तीनां संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी नागेशवाडी आणि झरी बु येथील परिसराची पाहणी करून, कोरोना बाधीत रुग्णांच्या घरा जवळील परिसर सिल करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नियमाचे पालन करावे आणि कोरोना पासून दूर राहावे.विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिगोळ (दे़शमुख) येथील एक व्यक्ती बाधित
रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला असून या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३ लोकांना बावची येथे क्वारंटाईन तर ५२ लोकांना होमक्वारंटाईन करुन कोरोनाबाधीत व्यक्तीची गल्ली कंटेंन्टमेंट झोन घोषीत करुन सील करण्यात आल्याची माहिती रेणापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांनी दिली तसेच तालुक्यात या आठवड्यातील हा तिसरा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे

डिगुळ देशमुख येथील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला ३० जून रोजी ताप, सर्दी, खोकला सुरू झाले म्हणून हा व्यक्ती लातूर येथील रुग्णालयात गेला औषध गोळ्या घेऊन तो परत डिगुळ देशमुख येथे आला त्यानंतर त्या व्यक्तीला ६,७ जुलैपासून जास्त त्रास होऊ लागला म्हणून पुन्हा लातूर येथील एम आय टी कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले़ तेथे या व्यक्तीला लक्षणे दिसू लागल्याने व लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे त्या व्यक्तीचे तपासणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची ९ जुलैच्या रात्री स्पष्ट झाला हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती डिगुळ देशमुख येथील असून त्याच्या घराजवळील १४ घरांचा त्यातील ५८ लोकांचा हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आला आहे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३ व्यक्तीना बावची येथे व उर्वरित ५२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ नारायण देशमुख यांनी दिली.

Read More  ‘मिशन ब्रेक दि चैन’ मोहीमेस व्यापारी,नागरिकांचा प्रतिसाद

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या