28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूररेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सांयकाळी ६ वाजता धरणाचे परत दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.या दोन दरवाजांमधून नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स (६२६.७५ क्युसेक ) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्याची ही आठवी तर सप्टेबर २०२२ या महिन्यात १२ दिवसात प्रकल्पाचे दरवाजे ६ वेळा उघडून रेणा नदी पात्रात सोडले असून नदीकाठच्या शेतक-यानी व नागरिकांनी सर्तक राहवे, असे आवाहन तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी केले आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी ६०८.४६ मी (आरएल) एवढी आहे. रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी घुसण्याची शक्यता न्ाांकारता येत नाही. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठच्या शेतक-यांंनी व नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. तर पाटबंधारे विभाग लातूरकमांक ७ चे उपविभागीय अभियंता एस.एम .निटूरे ,प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी , स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक एस .पी . डब्बे याच्यासह कर्मचारी रेणा मध्यम प्रकल्पावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या