26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरविद्युत शॉक लागून दोन शेळ्या दगावल्या

विद्युत शॉक लागून दोन शेळ्या दगावल्या

एकमत ऑनलाईन

चाकूर : तालुक्यातील आनंदवाडी गाव शिवारात दि २५ जुन रोजी मोठ्या पावसाने हजेरी लावली होती.त्यात अंदाजे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आनंदवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीसमोरील विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून दोन शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. या शेळ्या आनंदवाडी येथील तुकाराम निवृत्ती कोरे यांच्या मालकीच्या असुन, ससांयकाळी ६ वाजता शेळ्या घेऊन शेताकडून घराकडे जात असताना समशानभूमीसमोर असलेल्या पोलाला या शेळ्या चिटकल्या.

या विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोन शेळ्या दगावल्याचे, शेळी पालकाने सांगितले. प्रसंगावधानामुळे शेळी पालकाचे प्राण वाचले आहेत. सदर शेळ्यांचे अंदाजे वय प्रत्येकी तीन वर्षे होते व दोन्ही शेळ्या पाच महिन्याच्या गाभण असल्याचे शेळीपालकाने सांगितले. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे ३० हजार रुपयांंचे नुकसान झाल्याचे शेळी कोरे यांनी सांगितले. यावेळी महसूल विभागाकडून नायगाव तलाठी यांनी पंचासमक्ष पंंचनामा केला आहे. शेळी मालकाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या