37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरकोरोना नियमांचे पालन करुन भुकेल्यास दोन घास

कोरोना नियमांचे पालन करुन भुकेल्यास दोन घास

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शिवभोजन थाळी ही राज्यातील महाविकास आघाडीची महत्त्वकांक्षी योजना. शिवभोजन थाळी योजनेचा गतवर्षी प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना फक्त १० रुपयांत जेवण देण्यात येत आहे. योजना सुरु झाली आणि योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे शिवभोजन केंद्रांवरही कोरोना नियमांचे पालन करुन भुकेल्यास दोन घास दिला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेने बरिचशी उलथापालत केली. आरोग्य यंत्रणेसह इतर सर्वच यंत्रणांची प्रचंड धावपळ झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत होती की, मोठ्या प्रमाणात केलेल्या उपाययोजनाही तोकड्या पडत होत्या. अनेकांचा जीव गेल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेने काढता पाय घेतला. कोरोनाची दुसरी लाट आली. परंतु, ही लाट पहिल्या लाटेएवढी त्रासदायक ठरली नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना नागरिकांनी ब-यापैकी साथ दिली. लसीकरणास वेग आला आणि ही दूसरी लाट ब-यापैकी ओसरत असतानाच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणुने धुमाकुळ घातला. त्यामुळे शासनाला नव्याने निर्बंध घालावे लागले. नारिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी आदी निर्बंध घालण्यात आले. त्यासोबतच शिवभोजन केंद्रांनाही कोरोना नियमांचे निर्बंध घालण्यात आले.

सर्वच शिवभोजन थाळी केंद्रांनी स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना सरकारने दिली आहे. यामध्ये मास्कचा वापर करणे, लोकांमध्ये ३ फुटाचे अंतर ठेवणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करुन घेणे, भोजन तयार करणा-या तसेच वाटप करणा-या कर्मचा-यांनी वारंवार साबणाने हात धुणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. या सर्व नियमांचे पालन लातूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या