23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरशेंद दक्षिण शिवारात वीज पडून दोन जण ठार

शेंद दक्षिण शिवारात वीज पडून दोन जण ठार

एकमत ऑनलाईन

​शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद दक्षिण येथे वीज पडून १७ वर्षीय युवा शेतकरी व ३६ वर्षीय शेतमजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. दि.२५ रोजी दुपारी वीज पडून १७ वर्षीय युवा शेतकरी अभिजित राजकुमार मोरे व ३६ वर्षीय गौतम दिगांबर कांबळे हा शेतमजूर असे दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी शेंद द. येथे घडली.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद द. येथील १७ वर्षीय युवा शेतकरी अभिजित राजकुमार मोरे व ३६ वर्षीय गौतम दिगांबर कांबळे हा शेतमजूर असे दोघे जण शेतातून गावाकडे येत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.पावसामुळे हे दोघे ही शिवारातील सर्वे नंबर ६४/१ मधील सुरेश त्र्यंबक पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली थांबलेले असताना दुपारी अंदाजे साडे चार वाजताच्या दरम्यान अचानक वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला.

मयत अभिजीत राजकुमार मोरे हे अविवाहित आहेत तर मयत गौतम दिगंबर कांबळे हे विवाहित असून त्यांचे पश्चात पत्नी व तीन मुली असे वारस आहेत.या दोघांच्या अकाली निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Read More  राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या