30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeलातूरपोकलेनच्या स्फोटात देवकरा येथे दोन ठार

पोकलेनच्या स्फोटात देवकरा येथे दोन ठार

एकमत ऑनलाईन

किनगाव (जाकेर कुरेशी) : अहमदपूर तालुक्यातील किनगांव जवळच असलेल्या देवकरा गावाच्या शिवारात पोकलेनचा स्फोट होऊन दोघे जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. देवकरा येथील प्रभाकर विनायक मुरकुटे या शेतक-याची विहीर खोदण्यास पोकलेन-(जे.सी.बी) आली होती.पोकलेनचा भीषण स्फोट झाला.त्याचे सर्व लोखंङी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उङाले.

पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर विनायक मुरकुटे (वय ६३) रा. देवकरा, व दहिफळे बाबूराव पांङूरंग (वय ६८) राक़ोळवाडी याच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघाचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीचा ऑपरेटर भगतराज नारायण सारेआम रा. चिखला रा. मध्यप्रदेश हे जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले.घटनेची माहिती किनगांव पोलिस ठाणयास मिळताच तात्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाङीस पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रक मिळविले.सदरील घटना १८ एप्रील २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी श्रीकृष्णा प्रभाकर मुरकुटे वय ३८ धंदा.शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १९ एप्रील २०२१ रोजी किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का तोपरपे यांच्याकडे देण्यात आला आहे.

या घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जॉन डॅनियल बेन, जि.प.सदस्य अशोक केंद्रे,माजी जि.प.सदस्य त्र्यंबक गुट्टे यांनी भेट दिली.दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घङली पोकलेनसारख्या वाहनाचे पार्ट हवेत उङून कसे गेले? याबाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत. आवाज मोठा असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने घटनास्थळी जमले होते.अचानक घङलेल्या या विचिञ घडटनेमुहे गावातील नागरिकांमध्य्े काही काळासाठी भितीचे वातावरण पसरलं होत.

देवकरा स्फोटातील अपघातग्रस्तांना तातडीची मदत द्या
अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथे रविवारी झालेल्या पोकलेनच्या स्फोटात जागेवरच दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या अपघातग्रस्तांना तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी अशी आग्रही मागणी युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या स्फोटात प्रभाकर विनायक मुरकुटे,रा.देवकराता.अहमदपूर आणी बाबूराव दहीफळे रा.कोळवाडी ता.अहमदपूर यांचा जागेवरच अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधितांच्या कूटूंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्याने या कूटूंबावर कठीण वेळ आली आहे. या घटनेतील पीडित कुटुंबीयांना तसेच जमखीच्या कुटुबीयांस तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी, मागणी उपजल्हिाधिकारी,अहमदपूर ,आणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या