22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरनिलंगा तालुक्यात वीज पडून दोघे ठार, सात जनावरे दगावली

निलंगा तालुक्यात वीज पडून दोघे ठार, सात जनावरे दगावली

एकमत ऑनलाईन

निलंगा (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक गावात रविवारी अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला असून यात वीज पडून शेतकरी व व्यापारी या दोघांचा मृत्यू सात जनावरांचा मृत्यू झाला. निलंगा तालुक्यात गत चार दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून रविवारी दि ९ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला यात औराद येथील व्यापारी स्वत:च्या घरावर गच्चीवर काही साहित्य काढण्यासाठी गेले असता अचानक वीज पडून सुभाष किशन देशमुख (जैन) वय ३२ वर्षे यांचा व तगरखेडा येथील गोरोबा रामा सूर्यवंशी यांचे वीज पडून निधन झाले.

सुर्यवंशी हे शेळ्या राखत शिवारात फिरत असताना अचानक पाऊस आल्याने झाडाखाली आश्रय घेतला होता या पावसाने भाजीपाला फळबागांचेही मोठे नुकसान झाले. औरद हवामान केंद्रावर १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान सदरच्या घटनास्थळी तात्काळ सपोनि सुधीर सूर्यवंशी यांनी पोलीस कर्मचारी पाठवून पंचनामा करण्याची कार्यवाई पूर्ण केली. मदनसुरी येथे रेखा संजय चाटले यांची गाय ,येळणूर येथे रमेश भिमराव सोळंके यांची गाय व म्हैस, हंचनाळ येथील शेतकरी चंद्रकांत बिरादार दोन बैल , ताडमुगळी येथे शेषेराव पाटील यांच्या यांची गाय व हलगरा सुरेश संभाजी गंगथडे यांची एक गाय वीज पडून ठार झाली, वीज पडून निलंगा तालुक्यात सात जनावरे दगावली आहेत.

आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या