25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरवीज कोसळून दोन बैल, गाय, म्हैस ठार

वीज कोसळून दोन बैल, गाय, म्हैस ठार

एकमत ऑनलाईन

अहमदपूर/औसा : अहमदपूर तालुक्यातील मुळकी येथे दोन बैल, एक म्हैस तर औसा तालुक्यातील काळमाथा येथे म्हैस तर जवळगा येथे गाय वीज पडून ठार झाल्याची घटना घडली आहे. यात संबधित शेतक-यांचे आर्र्थिक नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यात मुळकी गावच्या शिवारात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ढग जमा होऊन अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी विजांचा कडकडाटासह व मेघगर्जनेसह जोराचा पाऊस होऊन वीज पडल्यामुळे दोन्ही बैल जागेवरच मरण पावली.

हे दोन्ही बैल शेतक-यांनी गेल्या वर्षीच घेतले होती. याचीकिंमत जवळपास एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी बैल बांधले होते त्याच्या बाजूला नवीन शेड करण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथे चार ते पाच जण काम करीत असताना ही वीज अचानक पडली आहे पण सुदैवाने मनुष्य जीवित हानी झाली नाही. बैलांवर वीज पडल्याची माहिती या गावचे तलाठी निळकंठ कुलकर्णी यांना समजताच त्यांनी मुळकी येथील शेतात जाऊन पंचनामा केला. ही माहिती तालुक्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना समजल्यानंतर त्यांनी पंचनामा करण्याच्या सूचना संबंधित गावच्या तलाठ्यांना दिल्या आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असून यातून या शेतक-यांना बैलाचे शवविच्छेदन केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना योग्य ती मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान मुळकी येथीलच राजेंद्र लोहारे यांनी चिंचेच्या झाडाखाली बांधलेली म्हैसीचाही वीज पडून मृत्यू झाल्याचे समजते.

औसा तालुक्यातील काळमाथा येथे दि.१ मे शनिवारी रोजी दुपारी ३:४५.च्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसात काळमाथा येथील जग्गनाथ लक्ष्मण गायकवाड यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला म्हैस बांधली असता पाऊस सुरू असताना वीज पडल्याने ती मरण पावली.सदर घटना स.नं.१८ मध्ये घडली आहे.यात जवळपास ७० हजारांची म्हैस दगावली. या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच तलाठी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. तालुक्यातील नागरसोगा, जवळगा, किल्लारी, गुबाळ या भागात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतक-यांच्या कडब्याच्या गंजीचे, कोंिथबीर, भाजीपाला व फुलशेतीचे नुकसान झाले. द्राक्ष, आंब्यांच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतक-यांनी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील जवळगा (पो.) येथील संजय राम लांडगे यांनी त्यांच्या शेतातील झाडाला बांधलेल्या दुभत्या गायीच्या अंगावर शनिवारी दुपारी ३.१५ वाजता वीज कोसळून गाय जागीच ठार झाली. संजय लांडगे यांनी ७० हजाराची गाय खरेदी केली होती. सकाळी व सायंकाळी मिळून १५ लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चाकूर तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस
चाकूर तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चाकूर, लातररोड,राचन्नावाडी,चापोली घरणी, नळेगाव,घारोळा, अलगरवाडी,हानमंतवाडी,जानवळ वडवळ ना परिसरात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली होती. मेघगर्जनेसह आणि वादळी वा-यासह सुरू होता. या वादळी वा-यसह पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसात आंब्यांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या