24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरऑक्सिजनवरील दोन रुग्णांची कोरोनावर मात

ऑक्सिजनवरील दोन रुग्णांची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत असताना उपचार घेऊन परत जाणाा-यांची संख्याही तेवढीच आहे. प्रत्येक रुग्णाला उपचार करण्यासाठी डॉक्टर व अरोग्य कर्मचारी तालुका प्रशासनाच्या उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसिलदार राहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच बावची येथील कोवीड सेंटरवर गेल्या १२ ते १३ दिवसांपासून ऑक्सीजनवर असलेल्या दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती तालुका अरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांनी दिली. कोवीड सेंटरवरील डॉक्टर व अरोग्य कर्मचा-यांनी या रुग्णांचे स्वागत करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

नातेवाईकांनी डॉक्टर व अरोग्य कर्मचा-यांचे मानले आभार.
कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेत ग्रामीण भागातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी बावची कोविड सेंटर व रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उभे करण्यात आले. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ग्रामीण रुगणालयास भेट देऊन सोयी व सुविधांचा आढावा घेतला व संबंधीत विभागाला सूचना केल्या. लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक अरोग्य केंद्राला भेट दऊन तेथील डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांशी सोयी व सुविधांबाबत आढावा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड सेंटरला ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली.

३१ मार्चपासून बावची येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. ४७६ पॉझिटीव्ह रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले होते. ३६१ रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले. या सेंटरवर ज्याचा सिटी स्कॅन स्कोर १४ ऑक्सीजन ८५ होता त्या दोन्ही रुग्णाला डॉक्टर व अरोग्य कर्मचारी यांनी गेल्या १२ ते १३ दिपसांपासून उपचार करून ऑक्सीजन ९५ तो ९७ पर्यंत आल्याने दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन गुरुवारी दि. ६ रोजी या दोन्ही रुग्णाला सुट्टी देत कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी स्वागत
केले.

या सेंटरवर तालुका अरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, आयूषचे डॉ.जी.एस.हालकंचे, डॉ. अविनाश कराड, डॉ. आकाश पुरी, श्रीमती व्ही.के लहाने, एस.आर.चावरे, सागर स्वामी, सचिन नितनवरे, अनुसया लहाने, शैला कटके, वंदना वाघमारे, रंजना हंगे, निघूना जानक, बावचकर , चव्हाण, बस्तापुरे हे रुग्णाची सेवा करीत आहेत.

औषधोपचार, मानसिक आधार मिळाला
बावची येथील कोविड सेंटरमधील शिवंिलंग बाबाअप्पा मुळे वय ६५ वर्षे रा. पानगाव ता. रेणापूर बब्रुवान ज्ञानदेव सोळुंके वय ५८ वर्ष रा. मोटेगाव ता. रेणापूर या दोघाना डॉक्टर व अरोग्य कर्मचा-यांनी वेळेवर औषधोपचार व मानसिक आधार दिल्यामुळे कोरोनावर मात केली.

तिढा सुटायचा तर…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या