22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरऑटो-जीपच्या अपघातात दोघे गंभीर जखमी

ऑटो-जीपच्या अपघातात दोघे गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

चाकूर : लातूर नांदेड रोडवर चापोलीनजीक रात्री नऊ वाजता बाजूची वाहतूक एकाच रस्त्यावरून सुरू असल्यामुळे ऑटो व बोलेरो पिकप यांची समोरासमोर धडक झाली आणि आटोतील दोघे गंभीर जखमी झाले. लातूर ते नांदेड रस्त्यावर चापोली जवळील गॅस गोडाऊनच्या समोर रात्री नऊच्या सुमारास ऑटो क्रमांक एम एच २४ ए टी ०६६५ ला समोरून महिद्रा बोलेरो पिकअप एम एच २४ ए यु ०७८२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील महिंंद्रा बोलेरो पिकअप हायगाईने निष्काळजीपणे चालवून समोरून येणा-या ऑटोला जोराची धडक दिली.

महिंद्रा बोलेरो पिकपचा चालक संजय नवनाथ पवार रा.कोरंगळा ता औसा जिल्हा लातूर व संतोष जगन्नाथ काळे वय ३५ वर्ष व्यवसाय ऑटो चालक रा माढा कॉलनी बाबळगाव रोड लातूर. हे अपघातात जखमी झाले. रक्ताने माखल्यामुळे त्यांना कोणी मदत करण्यास तयार नव्हते मात्र काही वेळातच त्या ठिकाणी वर्दीतील पोलीस आले आणि बघ्यांची गर्दी बाजूला सारून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवित त्या रक्ताने माखलेल्या दोन्ही जखमींना स्वत: पोलिस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोलीस कर्मचारी एच.सी तिघीले, पी.सी पाटील,चालक चापडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे उपचारार्थ दाखल केले.याबद्दल पोलिस कर्मचा-यांचे कौतुक होत आहे. या सोबतच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी त्या सर्व कर्मच्या-यांचे कौतुक करून शाबासकी दिली. या दोन वाहनांच्या अपघात संदर्भात नमूद आरोपीवर गुरंन ३०१/२०२२ कलम २७९ ३३७. .३३८, भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अमलदार पोह येमले हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या