22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरदोन चिमुकल्यांची कोरोनावर केली मात

दोन चिमुकल्यांची कोरोनावर केली मात

एकमत ऑनलाईन

चाकूर : कोरोना व्हायरस फैलाव रोखण्यासाठी विविध उपाय राबविले जात आहेत. मागील कांही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचा-यास कोरोनाची लागन झाली होती. त्याच्या संपर्कातील कर्मचा-याचा स्वॅब पाठविण्यात आला होता.पण तो निगेटीव्ह आला पण त्यांच्या कुटुंबातील पत्नीला व दोन मुलांनाही कोरोनाची लागन झाली होती. त्यांच्यावर चाकूर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन ते पूर्णत: बरे झाले व त्यांनी कोरोनावर मात केली.

आरोग्य कर्मचारी त्यांची पत्नी यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे छोटे मुल (वय तीन वर्ष) व अकरा महीन्यांच्या चिमुकल्यानी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाच्या नावानेच लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात तर या विषाणूने उद्रेक माजवला आहे पण प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर व योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे दोन चिमुकल्यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.

या परिवारांने चाकूर कोरोना केअर सेंटरमध्ये मिळत असलेल्या सोयी सुविधा, उपचार करणारी टीम, नगर पंचायतीचे कर्मचारी चांगले वातावरण आहे. घरच्या सुख सुविधापेक्षा चांगल्या सुविधा येथे मिळतात. जेवन उत्तम दर्जाचे आहे. येथील चांगल्या सुविधांबद्दल सर्वच टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनावर मात केली़ त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त आरोग्य कर्मचा-यांनी आपण प्लाझा दान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी चाकुर तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, नगरपंचायत मुख्याधिकारी अजिंंक्य रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक लांडे यांच्यासह रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी कोरोनावर मात केलेल्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

Read More  पालकमंत्री चव्हाणांच्या प्रयत्नामुळेच लेंडी प्रकल्प मार्गी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या