27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरजुनी पेन्शनसाठी दुचाकी रॅलीने लक्ष वेधले

जुनी पेन्शनसाठी दुचाकी रॅलीने लक्ष वेधले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जूनी पेन्शन योजना देशातील राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, ग्रामसेवक व तलाठी अशा विविध संघटनेच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांचा सहभाग होता. सांगता समारोपानंतर अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी. बी.गायकवाड, सरचिटणीस संजय कलशेट्टी, कोषाध्यक्ष गोविंद लाडकर, उपाध्यक्ष आर. एस. तांदळे, संपर्क प्रमुख दीपक येवते, महसूल संघटनेचे अध्यक्ष माधव पांचाळ, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष महेश हिप्परगे, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना गट ‘क’ चे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, सचिव दिलीप वाठोरे, पोलीस कार्यालयीन संघटनेचे अध्यक्ष सूदेश परदेशी, भूमी अभिलेख संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रल्हाद लखनगीरे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिव सचिन चव्हाण, तानाजी सोमवंशी, अरविंद पूलगूर्ले, संतोष क्षीरसागर, सिंचनचे निलरत्न बनसोडे आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेसह माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना गट-क, भूमि अभिलेख, सहकार, आरोग्य, सिंचन, पॉलिटेक्निक विभाग, मत्स्य व्यवसाय, अन्न व औषध प्रशासन, कृषी विभाग, मुद्रांक कार्यालय आणि वस्तू व सेवा कर, आयटीआय, सांख्यीकी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन संघटना, शिक्षक संघटना, पोलीस कार्यालयीन संघटना तसेच विभागातील संघटनांनी सहभाग नोंदविला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या