21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरबाल कामगारांना कामावर ठेवल्यास दोन वर्षांचा कारावास

बाल कामगारांना कामावर ठेवल्यास दोन वर्षांचा कारावास

एकमत ऑनलाईन

लातूर : बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ नुसार १४ वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात, प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच १४ वर्ष पूर्ण परंतु १८ वर्ष पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना धोकादाय उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर नियोकत्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यास ६ महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा २० हजार ते ५० हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात अशी तरतूद आहे.

कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद शैलंद्र पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. जैनब इक्तेसाद काझी सहायक कामगार आयुक्त लातूर यांनी आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी जनजागृती अभियान लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने राजीव गांधी चौक ते शिवाजी चौक कोविड-१९ चे सर्व नियम पाळून जनजागृती रॅली काढण्यात आली.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी विविध आस्थापनांना भेटी देऊन १४ वर्षाखालील कोणतेही मुल कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र भरुन घेतले व आस्थापना मध्ये बालकामगार काम करत नाहीत असे स्टिकर लावण्यात आले आणि बालमजुरी निर्मुलना बाबत मार्गदर्शन सहायक कामगार आयुक्त यांनी केले. लातूर जिल्हा कामगार मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष बाल कामगर कृती समितीचे पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधिक्षक निखील पिंगळे व सहायक कामगार आयुक्त लातूर जैनब इक्तेसाद काझी यांनी केले आहे.

बाल कामगार आढळल्यास तात्काळ कळवा
१२ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बाल कामगार कामावर ठेवणार नाही तसेच कोणत्याही आस्थापनेत बालकामगार आढळून आल्यास तात्काळ कामगार विभागास किंवा पोलीस विभागस कळविण्यात यावे, अशी शपथ देण्यात आली.

चिंचणी गाव झाडामुळे बनले ऑक्सीजन पार्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या