19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeलातूरदोन वर्षांनंतर ‘मांजरा’ प्रकल्प जिवंत

दोन वर्षांनंतर ‘मांजरा’ प्रकल्प जिवंत

एकमत ऑनलाईन

लातूर : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत गेली. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात आजघडीला ४८.१९ दलघमी पाणीसाठा आहे. दि. २७ सप्टेेंबर २०१८ रोजी या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला होता. तेव्हापासून लातूर शहरासह या धरणावर अवलंबुन असलेल्या सर्वच पाणीपुवठा योजनांना धरणातील मृतजलसाठ्यातून पाणी पुरवठा केला जात होता. तब्बल २३ महिन्यांनंतर या धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने हे धरण मृतावस्थेतून जीवंत झाले आहे. त्यामुळे लातूर शहराचा किमान एक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

मांजरा धरणाची जीवंत पाणीसाठा १७६.९६ दलघमी, मृतपाणीसाठा ४७.१३ दलघमी, एकुण पाणीसाठा २२४.०९ दलघमी तर पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर, अशी प्रकल्पीय स्थिती आहे. त्यापैकी दि. २१ ऑगस्ट रोजीचा पाणीसाठा ४८.१९ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा १.०६ दलघमी, पाणीपातळी ६३५.७९ मीटर एकुण पाणीसाठा २१.५२ टक्के तर १ जुन २०२० पासूनची आवक ३७.४७ दलघमी इतकी आहे.

लातूर जिल्ह्याची १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ८०२.१३ मि. मी. इतकी आहे. मात्र, आजपर्यंत १३३.०७ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. मांजरा धरणातील उपयुक्त जलसाठा दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला. गेली २३ महिने लातूर शहराला मांजरा धरणातील मृत जलसाठ्यातूनच पाणी पुरवठा केला जातो होता. यंदा मृग चांगलाच बरसरला. जून महिन्यात ब-यापैकी पाऊस झाला. जुलै आणि आता ऑगस्ट मध्येही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, धरणं कोरड्या स्थितीतून बाहेर पडत आहेत.

सन २०१९ च्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्यात पाऊसच नव्हता त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. मांजरा धरणात पाणीच नव्हते त्यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पााण्यात कपात करावी लागली आहे. दि. १ सप्टेंबर २०१९ पासून लातूर शहराला महिन्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा करावा लागला होता. पावसाने ओढ दिल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मांजरा धरणातून महानगरपालिकेला देण्यात येणा-या पाण्यात १५ टक्के कपातीवरुन ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली होती. आजघडीला मात्र मांजरा धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा किमान एका वर्षाचा प्रश्न सुटला आहे.

गतवर्षी याच तारखेला मांजरा धरणात ५.८७ दलघमी मृतजलसाठा होता
गत वर्षी याच तारखेला मांजरा धरणात केवळ ५.८७ दलघमी मृतजलसाठा आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराच्या पाणीकपातीची वेळी महानगरपालिकेवर आली होती. आजघडीला मात्र मांजरा धरणात ४८.१९ दलघमी पाणीसाठा आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असल्याने मांजरा धरणात आणखी पाणीपातळी वाढू शकणार आहे. शिवाय नेहमीप्रमाणे परतीच्या पावसाने पुन्हा लातूरकरांना साथ दिली तर कदाचित मांजरा धरण तुंडूंब भरुणही वाहील.

पेन्शन हा मूलभूत अधिकार; कायदेशीर परवानगीशिवाय कपात करता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या