लातूर : आपल्या खाजगी कामानिमित्त दि. १ ऑगस्ट रोजी रात्री लातूरहून सोलापूरला निघालेल्या लातूरच्या दोन तरुणांचा रात्री ९ वाजता तुळापूर रोडवरील काकरंबा येथे भीषण अपघात होऊन त्यात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. लातूर शहरातील ऐश्वर्या डिजीटल लॅबचे मालक सादीक पिरजादे याचा मुलगा साकिब सादीक पिरजादे हा सोमवारी रात्री त्याचा मित्र मोजम याच्यासह कारने खाजगी कामानिमित्त सोलापूरला जात होता.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार काकरंबा येथे आली आणि रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची कार जोरात आदळून दोन-तीन पलटी मारुन रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेंट कॉक्रीटच्या गट्टूला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, साकिब पिरजादे वय २० या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र मोजम गंभीर जखमी झाला. त्यास उस्मानाबादच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यास सोलापूरच्या दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच पहाटे ३ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. साकिब पिरजादे याच्या पार्थिवावर त्याच्या मुळ गावी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ब-हानपूर येथील मकदुम अल्लाऊद्दिन चिस्ती (र.) दर्गा परिसरात दफविधी करण्यात आला. साकिब हा लातूर शहरातील गांधी चौकातील ऐश्वर्या डिजीटल लॅबचे मालक सादीक पिरजादे याचा मुलगा, फास्ट फु डचे मालक सोहेल पिरजादे यांचा भाऊ तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फे व्हरेट क्लब लॅबचे मालक गौसभाई पिरजादे यांचा पुतण्या होता.