21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरउदगीर काँग्रेस शिष्टमंडळाने ऊसाला चांगला भाव दिल्याबद्दल मानले आभार

उदगीर काँग्रेस शिष्टमंडळाने ऊसाला चांगला भाव दिल्याबद्दल मानले आभार

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज शनिवार दि. १६ जुलै रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी उदगीर काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक झ्र २ तोंडारने गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन रूपये २७८२ रुपयाचा चांगला भाव दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

उदगीर तालुक्यातील गंगापूर- भाकसखेडा, हाळी, नागलगाव वाढवणा (खुर्द), वाढवणा (बु), किनी आदी गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन पदाधिका-यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आमदार देशमुख यांनी नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिराजदार, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, माधव कांबळे, गजानन बिराजदार, कुणाल बागबंदे, दत्ता बामणे, नंदकुमार परणे, अहमद सरवर, संजय पवार, संतोष बिराजदार, कुमार पाटील, हाळीचे चेअरमन अशोकराव माने, हाळीचे सरपंच ज्ञानेश्वर, गायकवाड उपसरपंच राजकुमार, पाटील व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, नागलगावचे चेअरमन कलाप्पा पाटील, वाढवणा (खुर्द)चे चेअरमन ज्ञानेश्वर गंगाधर भांगे, वाढवणा (बु)चे चेअरमन गणपतराव काळे, सरपंच नागेश थोटे, सरपंच विकास मुसने, दत्ता बामणे, किनीचे चेअरमन संतोष बिराजदार, गंगापूर-भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव, व्हा. चेअरमन हंसराज माळेवाडे, अतुल बिराजदार, जीवन पाटील, रौफ शेख, नागेश पाटील, राम पाटील, उसभुषण सुनील कुंठे, दत्ता वडजे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या