25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरउदगीर नगर परिषदेची विद्युत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

उदगीर नगर परिषदेची विद्युत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

एकमत ऑनलाईन

उदगीर नगरपरिषद पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल लाईट २५ लाखांच्या पुढें येते व काही दिवसातच ंिलंबोटी येथे उदगीर शहराला पाणीपुरवठा करणा-या योजनेचे विद्युत बिल जवळपास दर महिन्याला जवळपशास सत्तर लाखापेक्षा अधिक येत आहे. दरमहा एक कोटी लाईट बिल भरणे नगरपालिकेला परवडणारे नाही. म्हणून सर्व पाणीपुरवठा योजना या सौर उर्जेवर करण्याचा निर्णय २०१७ साली घेण्यात आला होता. एकूण अडीच मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने मान्यता देऊन त्यासाठीचे पैसे नगरपालिकेकडे वर्ग केले आहेत.

या प्रकल्पासाठी रॉ वाटर पाईप, शुध्द पाणीपुरवठा व पाण्याचे शुध्दीकरण यासाठी एकूण २८,४५,६०,५४ रुपयांची तरतूद आहे. एकूण चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. त्यातले बनशेळकी तलावावर ३५० केव्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पावर जनरेशन चालू आहे हाकनकवाडी येथील फिल्टर हाऊस वर १५० केव्ही प्रकल्प त्याचेही काम पूर्ण झाले आहे कुमठा खुर्द येथील १००० केव्ही प्रकल्प आहे त्याची जमीन संपादन झाले आहे त्याचे काम सुरू होत आहे. ंिलबोटी प्रकल्प येथील गोंडगाव या ठिकाणी १००० केव्ही सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचे संपादनासाठी मोजणी झाली आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहुन संबधीतांनी पाहणी केली. लोहा येथील भूमी अभिलेख विभागाने हे मोजणीचे काम करून जमिनीचे हद्दी कायम करून दिले आहेत, एक महिन्यात तेथील सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण होईल. असे चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहेत. असे संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी यावेळी सांगितले.

या मोजणी काम मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक दत्ताजी पाटील, नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता खटके , तेजस कन्स्ट्रक्शन कंपनी चे प्रोजेक्ट मॅनेजर गणेश पाटील, गोंडगाव येथील संपादित करीत असलेल्या जमिनीचे जमीन मालक ,लोहा तालुका भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७५ बाधीतांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या