23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरउजेड-बिबराळ-राणी अंकुलगा रस्ता बनला अपघातास निमंत्रण

उजेड-बिबराळ-राणी अंकुलगा रस्ता बनला अपघातास निमंत्रण

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : उजेड- बिबराळ- राणी अंकुलगा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे पडले आहेत.त्यात अरूंद रस्ता असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झूडपांनी रस्त्या वेढल्याने हा रस्ता प्रवाशी वाहनाधारकांसाठी अपघातास निमंत्रण ठरत आहे.पाईप पुलावर दोन ठिकानी भगदाड पडल्याने अपघात होत असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशी वाहनधारक व नागरिकांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड- बिबराळ- राणी अंकुलगा रस्ता करून अनेक वर्ष झाली. त्यात यांवर अवजड वाहने जावून व पावसाळ्यात रोडवरील पाण्याच्या निचरा झाला नसल्याने रोडवर खड्डे पडले तर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली आहेत. मात्र त्यानंतर ही या रस्त्याची साधी डागडूजी देखील झाली नसल्याने रहदारीस मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान उजेडहून बिबराळ, बाकली, राणी अंकुलगा, बसपूर व साकोळसह सिमावर्ती भागात जाण्यासाठी व या भागातील लोकांना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचा व सोपा मार्ग म्हणून परिचित असलेल्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात जागोजागी खड्डे पडले तर काटेरी झुडपांनी रस्ता वेढल्याने या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले असून यांवर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या