37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरपक्षांसाठी कुंड्या देण्यासाठी धावले मेहबूब चाचा

पक्षांसाठी कुंड्या देण्यासाठी धावले मेहबूब चाचा

एकमत ऑनलाईन

लातूर : यंदाचे वाढलेले प्रचंड ऊन..त्यामुळे इथले चराचर हैराण आहे. त्यांना नेहमीपेक्षा अधिक चारा-पाण्याची गरज आहे..त्यासाठी धडपडणारे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी गुरुवारी,दि.१२ मे २०२२ रोजी थेट मुलांचे शासकीय आयटीआय मध्ये पाण्याच्या कुंड्या घेऊन पोहोचले आणि त्या आयटीआय आवारातील झाडांवर बांधून देत प्राचार्या मनिषा बोरुळकर यांच्या हस्ते त्यामध्ये पाणी टाकून देऊन त्याचा शुभांरभ केला.

वाढत्या उन्हाळ्यात पक्षांना चारा-पाण्याची नितांत गरज भासत आहे, ती भागविण्यासाठी आपल्या परीने पक्षीमित्र महेबूब चाचा सतत धडपडत आहेत, गेली दोन-तीन महिन्यात त्यांनी अनेक शासकीय कार्यालय परिसरात विनामूल्य मातीच्या पाण्याच्या कुंड्या बांधून देवून त्यात पाणी टाकण्याचे ते आवाहन करीत आहेत.

विशेष म्हणजे त्यांचा सहचारिणी मेहरुनिस्साचे गतवर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे, त्यापोटी आलेल्या ५० हजार शासकीय अनुदानाचा ते मोठ्या मनाने पक्षांच्या चारा पाणी,वृक्षलागवडीसाठी उदार मनाने खर्च करीत आहेत,आज गुरुवारी,दि.१२ मे २०२२ रोजी भरदुपारी ते शिवाजी चौकातील शासकीय मुलांचे आयटीआयमध्ये आपल्या मालवाहू टेम्पोत १० मातीच्या कुंड्या घेवून दाखल झाले. तेव्हा प्राचार्य मनिषा बोरुळकर यांनी त्यांचे शाल,पुष्पहाराने स्वागत करुन,जगावेगळ्या पक्षीप्रेमाचे कौतुक केले.चाचांनी या कुंड्या लागलीच झाडांवर बांधून घेतल्या.त्यात प्राचार्या बोरुळकर यांच्या हस्ते पाणी टाकून त्या पक्षांना अर्पण केल्या. याप्रसंगी पत्रकार बाळ होळीकर, गटनिदेशक वसंत ठेले, सुनील जाधव, दिलीप जगदाळे, राजकुमार धनशेट्टी, निदेशक नरवाडकर, भांडारपाल प्रभू पवार, कर्मचारी बंडाप्पा बिडवे, नंदुबाई पखाले, बरदाळे, हसीना शेख आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या