24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeलातूरदोन दिवसांत शिवणी बॅरेजचे दरवाजे पूर्ववत दुरुस्त; क्षमतेच्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी जमा

दोन दिवसांत शिवणी बॅरेजचे दरवाजे पूर्ववत दुरुस्त; क्षमतेच्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी जमा

एकमत ऑनलाईन

लातूर : मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाज्याची अवध्या दोन दिवसात दुरुस्ती करुन पून्हा पाणी अडवण्यात आले असून या ठिकाणी आता क्षमतेच्या ३० टक्या पर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना सदरील काम जलद गतीने करण्याचे निर्देश दिले होते. नदीतील पाण्याचा प्रवाह चालू असे पर्यंत हे काम पूर्ण झाल्याने परिसरातील शेतक-यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामूळे नदी पात्रातील पाण्यात वाढ होवून मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामूळे बॅरेज मधील पाणी वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी ताबडतोब स्वंयचलीत दरवाजे दुरुस्त करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या होत्या. नदीचे पाणी वाहते आहे तो पर्यंत हे काम पूर्ण व्हावे अशा सक्त सुचना त्यांनी दिल्या होत्या.

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनीही सदरील बंधा-यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. स्वंयचलीत दरवाजा दुरुस्त करण्याच्या कामी सर्व प्रकारचे शासनस्तरावरुन सहकार्य करण्यात येईल काम त्वरीत पूर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्या होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दोन दिवस अहोरात्र काम करून हे स्वंयचलीत दरवाजे दुरुस्त केले आहेत. स्थानीक नागरीक तसेच कंत्राटदाराच्या मदतीने १५ आँक्टोबरच्या रोजी १ वाजता हे दरवाजे पुर्ववत बसविण्यात आले आहेत. १६ आँकटोंबर रोजी सकाळ पर्यंत या बॅरेजमध्ये ३० टक्के पाणी जमा झाले होते. या संदर्भातील माहिती पालकमंत्री देशमुख यांना समजताच त्यांनी अहोरात्र परिश्रम घेणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. येत्या काही दिवसात हे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास व्यक्त करून शेतक-यांनी काळजी करु नये असे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

 

जळकोट तालुक्यात आठ हजार हेक्­टरवरील पिकांचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या