32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरजनता कर्फ्यूला अभूतपूर्व प्रतिसद

जनता कर्फ्यूला अभूतपूर्व प्रतिसद

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलेल्या आवाहनास लातूर जिल्ह्यातील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद देत दि. २७ फेब्रुवारी रोजी स्वेच्छेने जनता कर्फ्यू पाळला. अत्यावश्यक सेव वगळता संपूर्ण बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. विनाकारण घराबाहेर पडणे, अनावश्यक बाहेर फिरणे नागरिकांनी टाळल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते. रविवारीही जनता कर्फ्यू पाळावयाचा असल्यामुळे जनतेने शनिवारी जसा प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद आजही राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी दि. २७ व २७ फेब्रुवारी रोजी स्वेच्छेने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. पहिल्याच दिवशी लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जनता, व्यापारी, उद्योजक यांनी स्वयंस्फु र्तपणे सहभागी होत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा, जीवनोपयोगी वस्तूंचे व्यवहार, नियम पाळून केले जाणारे विवाह, सर्व प्रकारच्या परीक्षा अशा कोणत्याही बाबीला अडकाठी असणार नाही. पोलिसांसह कोणतीही सरकारी यंत्रणा जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी जबरदस्ती करणार नाही. केवळ लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता यावा यासाठी शनिवार आणि रविवारी लातूर जिल्हावासीयांनी स्वत:हून जनता कर्फ्यू पाळावा.

विनाकारण घराबाहेर पडू नये. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे. व स्वत:हून जनता कर्फ्यू पाळावा. जेणेकरुन कोवीड-१९ विषाणूची साखळी आपल्याला तोडता येईल. त्याचबरोबर नागरीकांनी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सतत हात धुणे याचा अवलंब करावा. बाजारपेठ, मंगल कार्यालयांसारख्या सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाची यापूर्वीची स्थिती लक्षात घेवून लातूर शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश व्यापा-यांनी शनिवारी आपली दुकाने उघडलीच नाहीत.

शाळा, महाविद्यालये, छोटी, मोठी दुकाने, आडत बाजार, सराफी पेढी, कापड दुकाने, गंज गोलाई, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार कडेकोट बंद होते. बसस्थानकांत प्रवाशांची गर्दी नव्हती. काही प्रमाणात ऑटोरिक्षा, सी. टी. बस चालू होत्या.

लातूरकरांनी दाखवली सजगता
खरे तर शनिवारी शासकीय सुटी असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी, बाहेर गावचे कर्मचारी बाहेर पडलेच नाहीत. विशेष म्हणजे लातूरकरांनी जनता कर्फ्यूला स्वयंस्फु र्स्त प्रतिसाद देत सजगता दाखवून दिली आहे. शनिवारी जी सजगता होती तीच सजगता रविवारीही अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जनता कर्फ्यूला ९८ टक्के प्रतिसाद
शनिवारी लातूर शहरासह जिल्ह्यात जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा, व्यवहार कडेकोट बंद होते. बहूतांश दुकाने सकाळी उघडलीच नाहीत. पोलीस प्रशासनाच्या दप्तरी जनता कर्फ्यूला ९८ टक्के प्रतिसाद मिळाल्याची नोंद झाली आहे.

प्रवाशांअभावी काही बसफे-या रद्द
एस. टी. बेसेस चालू होत्या परंतु, जनता कर्फ्यूमुळे बसस्थानकांत प्रवाशांची गर्दी नव्हती. एखादा दुसराच प्रवाशी एस. टी. बसमध्ये दिसत होता. प्रवाशाअभावी जिल्हाअंतर्गत काही बस फे-या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.

विनामास्क फिरणा-यांवर कारवाई
दरम्यान महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पोलीस कर्मचारी मुकेश कोळी, मनपाचे स्वच्छता निरीक्षक अमजद शेख, हिरा कांबळे, रवि कांबळे, धोंडीराम सोनवणे, आदींनी शहरात विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली.

मुलांचा अभ्यास आणि पालकांची कसरत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या