25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : नगरपंचातीच्या हद्दीत शहरातील नागरिकांना शहरातच आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात याकरिता शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरात आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने शहरातील रुग्णांना उपचारासाठी ४ किमी लांब ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शहरातील प्रा.आ. उपकेंद्रात ओपीडी आवश्यक असल्याची आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली आहे.

दरम्यान शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास बारा जणांचा चमू आरोग्यसेवा देणार असून या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्यासंदर्भाने आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे,विविध रोगांवर लसीकरण करणे,गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरविणे, शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी व विविध आजारांवर उपचार होणार आहे. शहरात प्राथमिक उपकेंद्राची सुसज्ज इमारत असून त्यात स्वच्छता, पाणीपुरवठा लाईट व्यवस्था,बेड,फॅन, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर अशा प्रकारचे साहित्य व इतर सोयी नगर पंचायतमार्फत करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी नगराध्यक्ष प्रतिनिधी गणेश धुमाळे, पाणीपुरवठा सभापती उमाकांत देवंगरे, बांधकाम सभापती वीरभद्र मुदाळे, नगरसेवक संदीप बिराजदार, रतन शिवणे, दत्ता शिंंदे व डॉ.अनिल देवंगरे उपस्थित होते. यावेळी चर्चे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिका-यांनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासित केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या