24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरऊसाला प्रति मे. टन २०० रुपयांचा हप्ता

ऊसाला प्रति मे. टन २०० रुपयांचा हप्ता

एकमत ऑनलाईन

विलासनगर : प्रतिनिधी
मांजरा परिवारातील साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाच्या एफआरपीपोटी पेरणीसाठी प्रति मे.टन २०० रुपयांप्रमाणे दुस-या हप्त्याची रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक बचत खात्यावर वर्ग करण्याबाबतच्या सुचना मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी परिवारातील कारखान्याना दिल्या आहेत.

मांजरा परिवारात साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्रमी नोंद झाली होती. कार्यक्षेत्रातील उपलब्ध संपुर्ण ऊसाचे गाळप झालेले असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार २०२१-२२ हंगामातील गळीत ऊसासाठी एफआरपी पोटी पहिल्या हप्त्याची प्रति मे. टन २ हजार २०० रुपये प्रमाणे होणारी रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना दर दहा दिवसाला अदा केलेली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी निश्चित होऊन अदा करणेसाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागणार आहे.

तथापी, महाराष्ट्रामध्ये मान्सुनपुर्व पावसास सुरुवात झालेली असल्याने व मान्सुन केरळमध्ये दाखल झालेला असल्याने शेतकरी आंतर मशागतीची कामे तसेच पेरणीसाठी विवंचनेत होता. सदर परिस्थिती लक्षात घेऊन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी परिवारातील साखर कारखान्याकडे हंगाम २०२१-२२ मध्ये झालेल्या गळीत ऊसासाठीच्या एफआरपी पोटी प्रति मे.टन २०० रुपयांप्रमाणे दुस-या हप्त्याची अग्रीम रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना अदा करण्याच्या सुचना संबंधित कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवार दि. १३ जूनपासून संबंधीत ऊस पुरवठादारांच्या बँक बचत खात्यावर सदर प्रमाणे रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही संबंधित कारखान्याचे व्यवस्थापनामार्फत करण्यात येणार आहे.

मांजरा परिवारातील सर्वच कारखान्यांची वाटचाल विकासरत्न विलासराव देशमुख यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार गतीमान होत असून या वाटचालीस महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभत आहे. मांजरा परिवारातील साखर कारखाने हे कार्यक्षेत्रातील परिसरासाठी उत्पन्नाचे मुख्य आर्थिक स्त्रोत असून परिवारातील साखर कारखान्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन तसेच कारखान्याच्या कामकाजा विषयी असलेल्या विश्वासात दिवसें दिवस अधिकाधिक भर पडत आहे. एफआरपी पोटी रक्कम जमा होणार असल्याने पेरणीची चिंता संपल्याने सभासद, शेतकरी व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या