26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरउजेड येथील पटेल यांच्या घराची भिंंत कोसळली

उजेड येथील पटेल यांच्या घराची भिंंत कोसळली

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच असून या पावसात तालुक्यातील उजेड येथील सय्यद सादात चाँदपाशा पटेल यांच्या घराची भिंंत कोसळली आहे. रहदारी असलेल्या रस्त्यावरच भिंंत कोसळली असून सुदैवाने दिवसा घटना घडल्याने यात जिवित हानी झाली नाही.

उजेड येथील जमीनदार पै.चाँदपाशा पटेल यांचा मोठा वाडा असून या वाड्याला सुमारे चार ते पाच फुट रुंंद भिंती आहेत. यात गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसात मंगळवारी सायंकाळी सहा च्या सुमारास अचानक घराची भिंंत रस्त्यावर कोसळली आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा व झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सय्यद सादात चाँदपाशा पटेल व त्यांच्या भावंडांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या