28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeलातूरउद्या शहरातील दोन केंद्रावर लसीकरण

उद्या शहरातील दोन केंद्रावर लसीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ लसीकरणाचे नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्यात आले असून आज दि. ८ मे रोजी शहरातील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था व सिग्नल कॅम्पमधील औषधी भवन येथे लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत कोव्हिश्ल्डि तर औषधी भवन येथे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दिला जाणार आहे. त्यासाठी फक्त ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. सध्या लस उपलब्ध नसल्याने लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र राजीवनगर, पं. जवाहरलाल नेहरु मनपा रुग्णालय पटेल चौक, कम्युनिटी हॉल, कै. बबु्रवान काळे आयुर्वेद महाविद्यालय, शिवपुजे हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल, सुखदा हॉस्पिटल, श्री व्यंकटेश हॉस्पिटल व जटाळ हॉस्पिटल येथील ४५ वर्षांपूढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र उद्या बंद राहणार आहेत., अशी माहिती महानगरपालिका उपायुक्तांनी दिली.

मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हणजे तिघाडी सरकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या