18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरकोविडचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय

कोविडचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना प्रादुर्भावाची परिस्थीती आटोक्यात आली असली तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपलेला नाही, शिवाय या संदर्भात तिस-या लाटेची भिती कायम आहे. ही संभाव्य लाट प्रभावहिन ठरवण्यासाठी शासनाच्यावतीने ‘मिशन कवच‘कुंडल’ ही विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. नागरिक, शासकीय यंत्रणा तसेच सामाजिक संस्था, संघटना यांनी सक्रीय होऊन या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत ती यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी मिशन कवचकुंडल या विशेष लसीकरण मोहिमेच्या संदर्भाने म्हणाले की, सद्या लातूरसह राज्यातील कोरोना प्रादूर्भावाची परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र काही जिल्ह्यात अचानकपणे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिस-यालाटेची भिती कायम आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता लसीकरण झालेल्या नागरीकांच्या जीवीताला धोका नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोची संभाव्य तिसरी लाट प्रभावहिन ठरवण्यासाठी शासनाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मिशन कवच कुंडल ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वत:चे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सक्रीय झालेल्या आहेत. सामाजिक संघटना, संस्था यांनीही जनजागृतीसाठी पूढाकार घ्यावा. लसीकरणा संदर्भात नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमज दूर करावेत, ज्या ठिकाणी जास्त संख्येने कामगार काम करतात तेथे जाऊन तात्पुरते लसीकरण केंद्र उभारावेत, वृध्द, अपंग लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नागरिक, सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांनी पूढाकार घेऊन ही मोहिम यशस्वी केल्यास आपला जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाची लागण झाले नंतर उपचार घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेऊन नागरिकांनी स्वताचे लसीकरण करुन घेतल्यास मोठा धोका टळणार आहे ही बाब प्रत्येक नागरिकाला समजावुन सांगण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका या स्थानिक स्वराज्य संस्था, सहाकरी संस्था, शिक्षण संस्था व इतर विविध प्रकारच्या संस्थामध्ये लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांत १० हजार २३५ नागरिकांनी घेतली लस
लातूर जिल्ह्यात लसीकरणाचे काम चांगले झाले आहे. जिल्हयातील ९ लाख ५२ हजार २८४ लोकांनी पहिला डोस घेतला असून हे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे. दोन डोस पूर्ण झालेल्यांची संख्या ४ लाख ४ हजार १७६ एवढी आहे हे प्रमाण २० टक्के पर्यंत गेले आहे. मिशन कवच कुंडल ही विशेष मोहिम सुरू झाले पासून जिल्हयात १० हजार २३५ नागरिकांनी लस घेतली आहे. ८ आँक्टोबर रोजी सूरु झालेली ही विशेष मोहिम १४ आँक्टोबरपर्यंत असणार आहे. या मोहिमेत जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी २४४ केंद्र उभारण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या