34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरदहावी, बारावी परीक्षेचे काम करणा-या कर्मचा-यांना लस बंधनकारक

दहावी, बारावी परीक्षेचे काम करणा-या कर्मचा-यांना लस बंधनकारक

एकमत ऑनलाईन

जळकोट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने या महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांना सुरुवात होणार आहे, या परीक्षेच्या कालावधीत एका शाळेतून शेकडो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, परीक्षा केंद्रावर जे शिक्षक पर्यवेक्षनाचे काम करणार आहेत, त्यांना एक तर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागणार आहे,किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे, या दोन गोष्टी केल्या शिवाय संबंधित पर्यवेक्षकास पर्यवेक्षनाचे काम करता येणार नाही.

लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने लातूर, नांदेड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षा होणार आहेत. पूर्वी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर या परीक्षा होत असत परंतु यावर्षी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, यामुळे शासनाने ज्या शाळेत दहावी व बारावीचे वर्ग आहेत त्या शाळेत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता यामुळे कोरोना आजाराचा प्रसार कमी होणार आहे, असे असले तरी परीक्षेच्या कालावधीत त्या शाळांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दहावी तसेच बारावीच्या सर्व परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थ्यांची संबंधित शाळेत थर्मल स्क्रींिनग होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा ताप तसेच ऑक्सिजन मोजले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा देते वेळी त्यांच्यामध्ये योग्य अंतर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: पिण्याच्या पाण्याची बाटली आणायचे आहे.

जे कर्मचारी पर्यवेशनाचे काम करणार आहेत त्यांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहेकिंवा कोरोनाची लस घ्यावी लागणार आहे. जे कर्मचारी कोरोनाची लस घेणार नाहीत , त्यांना आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे. लातूर विभागीय शिक्षण मंडळा अंतर्गत अनेक जिल्ह्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचा-यांना संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण होऊनये म्हणून योग्य खबरदारी घ्यावी लागणार आह.

अर्थव्यवस्था आणि लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या