22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरलातूर शहरातील ३० वर्षांपुढील नागरिकांना आजपासून लसीकरण

लातूर शहरातील ३० वर्षांपुढील नागरिकांना आजपासून लसीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर मनपाच्या वतीने शहरातील ३० वर्षापुढील नागरिकांनाही आता लस दिली जाणार आहे. आज दि.२० जूनपासून हा उपक्रम सुरु होत असून शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावे. स्वत: व आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता चांगलीच गती घेतली आहे. प्रारंभीच्या काळात विविध वयोगटात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. आता ३० वर्षावरील तरुणांनाही लस देण्यास प्रारंभ झाला. लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक टप्प्यात त्या-त्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले की, व्यवसाय तसेच इतर कारणांनी तरुण मंडळी सतत घराबाहेर असतात. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची बाधा लवकर होत नाही असे म्हटले जाते.अशा व्यक्तींना स्वत:ला कोरोना झाला नाही तरी हे तरुण बाधितांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या माध्यमातून घरात आई-वडील तसेच इतर वृद्ध मंडळींना लागण होऊ शकते. असे होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ३० वर्षापुढील तरुणांच्या लसीकरणासाठी रविवार पासून मोहीम सुरू केली जाणार आहे .

आज शहरातील महानगरपालिकेच्या सात केंद्रावर तसेच दोन फिरत्या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू राहणार आहे. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, दयानंद महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शिवाजी चौक, विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण), यशवंत शाळा प्राथमिक नागरी केंद्र,साळे गल्ली, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर ,विवेकानंद चौक व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर, (मनपा शाळा क्रमांक ९) या सात केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. लसीकरणासाठी कार्यान्वित करण्यात आलेले मोबाईल पथक मनपा शाळा क्रमांक २८. इंडिया नगर व रुकैय्या बेगम शाळा,अंजली नगर या ठिकाणी लसीकरणाचे काम करणार आहे.पहिल्या सात लसीकरण केंद्रावर ३० ते ४४ तसेच ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे.मोबाईल पथक मात्र केवळ ४५ वर्षापुढील नागरिकांना लस देणार आहे.

सर्वच ठिकाणी कोविशील्ड लस उपलब्ध आहेत. ३० ते ४० वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीचा फक्त पहिला डोस दिला जाईल.सर्वच केंद्रावर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीचा चा पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. ज्यांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनाच हा डोस दिला जाणार आहे.ऌउह व ऋछह चा पहिला व दुसरा डोस लसीकरण केंद्रावर दिला जाणार आहे. या लसीकरणासाठी कसलीही नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत लसीकरण सुरू राहणार आहे. शहरातील अधिकाधिक तरुणांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा. स्वत:ला कोरोना पासून दूर ठेवावे तसेच आपल्या माध्यमातून कुटुंबियांना असणारा धोका दूर करावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

एकट्या मुलांना सांभाळताना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या