25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरजिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरण पूर्ण करावे; पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

जिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरण पूर्ण करावे; पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

एकमत ऑनलाईन

लातूर : लातर जिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे, सर्व रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी, रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, दुस-या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी आदी निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

कोवीड-१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर दुस-यांदा लागू झालेला लॉकडाऊन, बाधीत रुग्णावरील उपचार, औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा, १८ वर्षावरील वयाच्या जनतेसाठी सुरू होत असलेली लसीकरण मोहिम या अनुषंगाने लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. १ मे रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह, लातूर येथे लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, आयएमए पदाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दीपक सूळ, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक महादेव बनसुडे, डॉ. गंगाधर परगे, डॉ. संजय ढगे, डॉ. बालाजी बरुरे, डॉ. अशोक पोद्दार यांच्यासह आय.एम.ए. पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील कोवीड-१९ चा प्रादूर्भाव बाधीत रुणावरील उपचार, औषधे, ऑक्सिजन इतर वैद्यकीय साहित्यांची उपलब्धता, रुग्णसंख्या आणि रुग्णालयातील बेडची उपलब्धता. लॉकडाऊनची अंमलबजावनी, जनतेच्या अडीअडचणी यांच्या संदर्भाने माहिती करून घेतली, आयएमएच्या सदस्यांनीही व्हेन्टिलेटरची उपलब्धता, रुग्णालयातील कचरा व्यवस्थापन, अग्निशमन व्यवस्था या अनुषंगाने माहिती देऊन खाजगी रुग्णालयातील उपचार व अडचणी संदर्भात माहिती दिली.

पहिल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परीणाम दिसत असल्यामुळे दुस-या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावनी करावी, ग्रामिण भागात प्रादूर्भाव वाढू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, जिल्ह्यात १०० दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे असे निर्देश बैठकी दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

२५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावात विलगीकरण केंद्र उभारावे, शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे, सर्व रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी, रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, दुस-या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी. जिल्ह्यातील लातूर व इतर शहरातील कोवीड तपासणी वाढवावी, कोवीड तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळण्याची व्यवस्था उभारावी, एमआयएमएसआरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात क्षमते प्रमाणे कोवीड१९ रुग्णसेवा घडावी बैठकी दरम्यान आदी सुचना देऊन ऑक्सिजन, औषधे व लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करुन दिली जाईल असे आश्वासन या बैठकी दरम्यान दिले.

पालकमंत्री म्हणाले…
> शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे.
> सर्व रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी.
> रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा.
> दुस-या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी.
> २५ पेक्षा जास्त रूग्ण असलेल्या गावात विलगीकरण केंद्र उभारावे
> जिल्ह्यातील लातूर व इतर शहरातील कोवीड तपासणी वाढवावी
> कोवीड तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळण्याची व्यवस्था उभारावी
> एमआयएमएसआरच्या वैद्यकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात क्षमते प्रमाणे कोवीड-१९ रुग्णसेवा घडावी

उदगीर येथे ऑक्सिजन प्लांट
उदगीर येथील रुग्णालयासाठी ऑक्सिजनची वाढत असलेली मागणी आणि वाहतुकीदरम्यान येत असलेल्या अडचणी लक्षात घेता विलास सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक २ येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणे शक्य आहे का याची शक्यता तपासून पहावी अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी दिली. ५० पेक्षा जास्त बेड असलेल्या सर्वच शासकीय व खाजगी रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

दिग्गजांच्या साथीमुळे अवताडेंचा विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या