23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरदृष्टीबाधित वैद्यराज रोकडेंनी स्वत: केली वृक्षांची लागवड

दृष्टीबाधित वैद्यराज रोकडेंनी स्वत: केली वृक्षांची लागवड

एकमत ऑनलाईन

लातूर : खाण्यासाठी घरी आणलेल्या विविध फळांच्या बियांची घराच्या छतावर, टाकाऊ प्लास्टिक पिशव्या, काळ्या मातीत वर्षाखाली स्वत: लागवड करुन नर्सरी पेक्षा तजेलदार २५ अनेक रोपट्यांची लातूरच्या म्हाडा कॉलनीतील दृष्टीबाधित वैद्यराज तुकाराम रोकडे यांनी वर्षभर जीवापाड जोपासना करून ती रविवार दि. २० जून २०२१ रोजी आपल्या ८० किलोमीटर दूरच्या तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील शेतीत लावून डोळसांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.

लातूरच्या म्हाडा कॉलनीतील दृष्टीबाधित नाडीपरीक्षक वैद्यराज तुकाराम रोकडे यांना देशी, वनौषधी, वनस्पतींची चांगली जाण, आवड आणि पर्यावरणाविषयी आस्था असल्याने त्यांनी, आपल्या तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील डोंगरउतारावरील शेतात गेली दोन वर्षात जांभळ, पिंपळ, नारळ, सीताफळ, कवट,बेल, चिंच, बोर, लिंब, आवळा, आंबा, साग, तूती, करंज, सागरगोटा या देशी तसेच अडुळसा आदी चारशे देशी वृक्ष, कलमांची मोठ्या परिश्रमाने लागवड व संगोपन केले. या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून मुक्या वन्य व पाळीव जनावरांसाठी पाण्याचा हौद बांधून त्यांची अठराशे फुटांची पाईपलाईनने पाणी सोडून तहान भागवत आहेत. एवढेच नव्हे तर लातूरच्या म्हाडातील घराच्या दुस-या माळ्यावर काळी माती टाकून, प्लास्टिक पिशव्यांमध्ये घरात खाल्लेल्या जांभूळ, आंबा, उंबर, लिंबूच्या बिया, गजगा, मेहंदी, अडुळसा, कोरफड, निरगुड, बदाम, कढीपत्त्याच्या कलमांची लावण करुन, त्याची नित्यनेमाने निगा राखून ते नर्सरी पेक्षा हे तजेलदार बनवली. आता पावसाळा सुरु झाला म्हणून ती आपल्या शेतात लागवड करुन डोळसापुढे आदर्श ठेवलेला आहे.

आज सर्वांना ऑक्सिजन…ऑक्सिजन म्हणण्याची कोरोनाने वेळ आणली आहे, अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून प्रत्येक नगारिकांनी आपल्या अंगण, परस, खुल्या, सार्वजनिक जागा तसेच शेतीच्या बांधावर ,पडीक शेतीत, त्याचबरोबर खास देशी व वनौषधींच्या झाडांची लागवड व संगोपण करुन पर्यावरणाला हातभार लावावा. आपल्या आर्थिक सक्षमतेसाठी तसेच पुढच्या पिढ्यांसाठी झाडे, फळे आणि शुध्द हवेची निर्मितीसाठी वेळीच पाऊल उचलावे असे आवाहन यावेळी वैद्यराज रोकडे यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

याप्रसंगी वेस्टीज इंडिया प्रा. लि. चे वितरक वाघंबर बाजुळगे व प्रा. दत्ता सुर्यवंशी यांनी रोकडे यांच्या कार्यास पर्यावरण पूरक कामास मदत म्हणून त्यांना बहुपयोगी खत व लिक्विड भेट देऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी पत्रकार बाळ होळीकर, भारतीय बौद्ध महासभा लातूर तालुका अध्यक्ष देवराव जोगदंडे, ऑटोचालक हूसेन सय्यद, दादासाहेब रोकडे, उस्मान शेख, शकील शेख, शाहबुद्दीन शेख आदी शेतकरी, वृक्षप्रेमी उपस्थित होते.

पत्नीला लावली कोरोना ड्युटी,राग आलेल्या पतीने मुख्याधापकालाच केली बेल्ट ने जबर मारहाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या