23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरआई वडीलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीस ९८ टक्केगुण

आई वडीलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीस ९८ टक्केगुण

आई बाबा मी पास झाले सांगू कोणाला? डॉक्टर होण्याचे स्वप्न

एकमत ऑनलाईन

चाकूर : बाल वयातच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीचा सांभाळ मावशी, आजी आजोबांनी (बार्शी) वैष्णवीचा सांभाळ केला. वैष्णवी उल्हास पोटे हिने चाकूरच्या जगत् जागृती विद्या मंदिरातून इयत्ता दहावी ला ९८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बार्शी येथे वैष्णवीच्या वयाच्या सहाव्या वर्षी आई रंजनाचा मृत्यू झाला तर वडील उल्हास यांचा ती दहा वर्षाची असताना मृत्यू झाला. त्यामुळे अहमदपूर येथील योजना मलशेट्टे या मावशीने यशवंत विद्यालयात पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. तर पाचवी पासून दहावीपर्यतचे शिक्षण चाकूर येथील जगत्जागृती विद्या मंदिरात आजी सुशिलाबाई व आजोबा विश्वनाथ शेटे यांनी पूर्ण केले.

आई बाबा मी पास झाले हे सांगण्यासाठी आई वडील नाहीत म्हणून ती खचली नाही तर आजी आजोबा व मावशाच माझ्यासाठी सर्वस्वी आहेत असे ती म्हणते. भविष्यात डॉक्टर होऊन पैसे कमावण्याला प्राधान्य न देता ते एक सामाजिक कार्य आहे. असा पायंडा पुन्हा एकदा समाजात निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे अभिमानाने वैष्णवीने सांगितले. तिच्यासाठी तीची पुण्यात उद्योजक असलेली पल्लवी पानगावे ही मावशी आदर्श आहे. या यशाचे श्रेय आजी आजोबा आणि शिक्षकांना यांना ती देते.अत्यतं गुणी आणि हूशार अशी आमची नात असल्याची भावना आजी आजोबा यांनी व्यक्त केली आहे.अशा गुणी आणि हूशार वैष्णवीची स्वप्न पूर्णत्वास येवो,अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Read More  आई वडिलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलीस मिळाली मदत

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या