25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरआमदार रमेश कराड यांच्­या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

आमदार रमेश कराड यांच्­या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेश कराड यांच्­या जन्मदिवसानिमित्त आज दि. ३० मे रोजी लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक गावागावत ग्रामदेवतांना महाअभिषेक, रक्­तदान शिबीर, पेढेतुला, कुस्­तीस्­पर्धा, यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्­यात आले आहे. आमदार रमेश कराड यांच्­या जन्मदिवसानिमित्त आज सकाळी ९ वाजता रेणापूर येथील ग्रामदेवता आदिशक्­ती श्री.रेणूकादेवी मंदिरात आमदार रमेश कराड यांच्­या शुभहस्­ते अभिषेक आणि आरती करण्­यात येणार असून त्­यानंतर मंदिरात भाजपाचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्­यक्ष अनिल भिसे यांच्­या वतीने आमदार कराड यांचा पेढेतुला कार्यक्रम आयोजित करण्­यात आला आहे.

रेणापूर येथील विविध कार्यालयात कार्यरत असलेल्­या सफाई कामगारांचा याप्रसंगी सत्­कार करण्­यात येणार आहे. आमदार रमेश कराड यांच्­या जन्­मदिनानिमित्त संयोजन समितीच्­या वतीने सकाळी ११ वाजता अभिष्­ठचिंतन सोहळयाचे आयोजन करण्­यात आले आहे. या सोहळयाला भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी ‘संवाद’ या आमदार कराड यांच्­या लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील असलेल्­या नवीन संपर्क कार्यालयात आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्­या वतीने अनिल भिसे, बन्­सी भिसे, अ‍ॅड.दशरथ सरवदे, हणमंतबापू नागटिळक, पद्माकर चिंचोलकर आणि राजकिरण साठे यांनी केले आहे.

यशवंतराव चव्­हाण ग्रामीण रुग्­णालय येथे सकाळी ९ वा. श्रीमती सरस्­वती कराड रक्­त पेढीच्­या वतीने रक्­तदान शिबीराचे आयोजन करण्­यात आले आहे तर दुपारी ३ वाजता लातूर तालुक्­यातील मौजे नांदगाव येथे पवनपुत्र हनुमान मैदानी कुस्­तीस्­पर्धेचे आयोजन ऋ षीकेश कराड मित्रमंडळाच्­या वतीने करण्­यात आले आहे. रेणापूर तालुक्­यातील मौजे दर्जीबोरगाव येथील चिन्­मयानंद स्­वामी देवस्­थान येथे अभिषेक, मौजे मोटेगाव येथील तात्­यामहाराज मंदिरात महाआरती, मौजे शेरा येथील दावद मलिक बाबा दर्गाह येथे चादर चढवणे, मौजे दवणगाव येथील श्री दवणेश्­वर मंदिरात अभिषक, पानगाव येथील भारतरत्­न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्­या अस्­थीचे पुजन, मौजे कोष्­टगाव येथील श्री. निळकंठेश्­वर मंदिरात अभिषेक, खरोळा येथील श्री दत्­त मंदिर आणि गोंिवदनगर येथील श्री बालाजी मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्­यात आले आहे. लातूर तालुक्­यातील मौजे सोनवती येथील खंडोबा मंदिरात अभिषेक, मुरूड अकोला येथे दर्गाहला चादर चढवणे, मुरुड येथील मुरुडेश्­वर मंदिरात महापूजा, मौजे सारसा येथील गणेशनाथ देवस्­थानात महाआरती, मौजे चिंचोली ब. येथील बल्­लाळनाथ मंदिरात महापूजा, मौजे निळकंठ येथील श्री निळकंठेश्­वर मंदिरात महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्­यात आले आहे.

तसेच औसा तालुक्­यातील मौजे भादा येथे हरीहर मंदिर येथे अभिषेक, मौजे टाका येथील भिमाशंकर मंदिरात अभिषेक व साखर वाटप, मौजे शिवली येथील हनुमान मंदिरात महापूजा व केळीचे वाटप, मौजे काळमाथा येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्­यात येणार आहे. त्­याचबरोबर लातूर ग्रामीण मतदार संघातील गावा गावातील भाजपाचे कार्यकर्ते ग्रामदेवतांची विधीवत महापुजा करुन आमदार रमेश कराड यांना दिर्घ आयुष्­य लाभो यासाठी प्रार्थना करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या