25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरगिफ्ट सेंटरच्या दुकानांत भाजीपाला; टाळेबंदीच्या काळात भाजी विक्रीचा आधार

गिफ्ट सेंटरच्या दुकानांत भाजीपाला; टाळेबंदीच्या काळात भाजी विक्रीचा आधार

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : कोरोनाच्या टाळेबंदीत भाजीपाला विक्री अनेक कुटूंबांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.त्या नियमांचा पालन करत बंद पडलेलेल्या गिफ्ट सेंटरच्या दुकानात चक्क भाजीपाला दुकान थाटून कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न शहरातील व्यवसायिक करत असून उदरनिर्वाह होत असला तरी दुकानाचे भाडे,बँकेचे हफ्ते कसे फेडायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे काही लोक तुपाशी तर काही लोक उपाशी, अशी गत व्यापाऱ्यांची झाली आहे. यावर तोडगा काढत शासन नियम न मोडता आगळीवेगळी युक्ती शिरूर अनंतपाळ येथील व्यापाऱ्यांनी शोधली असून गिफ्टच्या दुकानात चक्क भाजीपाल्याचे दुकान थाटले आहे.

टाळेबंदी, संचारबंदीमुळे शासनाने दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले.हे आदेश देताना अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच नियमाचा आधार घेत शिरूर अनंतपाळ शहरातील हरीअंजन त्र्यंबक ईटकर या व्यापाऱ्याने दुकानातून अत्यावश्यक सेवा देणार आहेत.त्यामुळे ग्राहकांंना गिफ्ट सेंटर व प्रिंटर्ससच्या दुकानातून चक्क भाजीपाला व फळफळावळे खरेदी करता येणार आहेत.

शहरातील हरीअंजन त्र्यंबक ईटकर हे गेल्या वीस वर्षापासून फोटो फ्रेम, गिफ्ट व प्रिंटर्स चे काम करतात.काळानुरुप त्यांनी बँकेचे कर्ज काढून शहरातील मुख्य अशा बसवेश्वर चौकात नम्रता गिफ्ट व प्रिंटर्स या नावाने अत्याधुनिक दुकान थाटले. गेल्या चार वर्षाखाली त्यांनी बॅंकेचे कर्ज काढले. सुरुवातीला दुकान चांगले चालत असल्याने दुकानाचे भाडे व बँकेचे हफ्ते कसे बसे ते फेडत असत. मात्र मार्च २०२० पासून कोरोनारूपी टाळेबंदीने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.

गेल्या वर्षभरापासून दुकान बंद आहे. त्यात घरात खाणारी दहा तोंडे, बँकेचे हप्ते व दुकानाचे सव्वा लाख भाडे कसे फेडायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. या अडचणीच्या काळात ही त्यांनी न डगमगता त्यातून मार्ग काढत टाळेबंदीच्या काळात भाजीपाला विकण्याला सुट असल्याने त्यांनी भाजीपाला व फळफळावळांचे दुकान थाटले आहे. त्यातून पोटापाण्याचा प्रश्न मिटला, मात्र जीवनावश्यक खर्च व लोकांची देणी कशी फेडायची या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

शासनाने छोट्या व्यवसायकांना आर्थिक मदत द्यावी.
कोरोनाच्या टाळेबंदीत छोटे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. गेले वर्षभर दुकान बंद त्यात परत या संचार बंदीने दुकाने बंद झाल्याने त्याचे भाडे व बँकाचे हप्ते कसे फेडायचे.जगण्यासाठी धडपड करावी लागत असून यातून बाहेर निघणे कठीण जात असून शासनाने छोट्या व्यवसायकांना आर्थिक मदत दिल्यास थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे.
हरीअंजन ईटकर

फेरनोंदणी न झालेल्या साडेचार लाख घरेलू कामगारांनाही मिळणार मदत – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या