25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरसाई रोड, शास्त्री कॉलनी येथील रस्त्याची प्रचंड दुरावस्था

साई रोड, शास्त्री कॉलनी येथील रस्त्याची प्रचंड दुरावस्था

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील साई रोड, लालबहादूर शास्त्री गृहनिर्माण सोसायटी, आर्वी येथील रस्त्यांची पावसामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरीक, महिला, पादचा-यांचे अतोनात हाल होत आहेत. या भागात पक्की सडक करण्याची येथील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. शासन दरबारी अनेक वेळा निवेदन देऊनही, रस्ता रोको करुनही नागरी सुविधांपासून हा परिसर वंचित आहे.निव्वळ आदिवासी भागात राहत असल्याचा अनुभव येथील त्रस्त नागरिक घेत आहेत.

या भागातील गटारी तुंबल्या व फुटल्या असून सर्व घाण पाणी कच्च्या रस्त्यावर येत आहे. घाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १९८४ साली लातूर नगर परिषद कर्मचारी यांनी स्थापन केलेली ही गृहनिर्माण संस्था आहे. पावसामुळे येथील रस्ता खड्डेमय व निसरडा झाला असून मोठ्या प्रमाणावर चिखल झाले आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, पादचा-यांचे अतोनात हाल होत आहे. महानगरपालिकेने या परिसरात पक्की सडक, फवारणी, गटार दुरुस्ती, नियमित स्वच्छता इत्यादी बाबींकडे लवकरात लवकर लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या