33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय

लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतीवर काँग्रेस विचारसरणीच्या पॅनलचे उमेदवार विजय झाले आहेत. विजयी होऊन भेटीस आलेल्या उमेदवारांचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लातूर तालुक्यातील ६४, औसा ४६, रेणापुर २८, निलंगा ४८, देवणी ३४, अहमदपूर४९, चाकूर २४, उदगीर ६१, जळकोट २७ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २७अशा लातूर जिल्ह्यातील एकुण ४०८ ग्रामपंचायतींची निवडणुक नुकतीच पार पडली. यात २५ ग्रामपंचायतींची निवडणुक ही बिनविरोध झाली होती. लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा गड असून प्रत्येक गावात या पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूका दोन्ही बाजूनी काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी लढवत असल्याचे दिसून येत होते. याठिकाणी दोन्ही बाजूनी काँग्रेस विचारसरणीच्या उमेदवारात मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. सोमवारी निकाल जाहीर झाले तेव्हा जिल्ह्यातील बहुतांश विजयी झालेले उमेदवार आपल्या पॅनल प्रमुखांना घेऊन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना भेटत होते. लातूर, रेणापूर तालुक्यातील ९० टक्केपेक्षा अधिक इतर ८ तालुक्यातील ७० टक्क्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

निवडणूक संपली आता पुढे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करावा, याकामी आपण सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सर्वांना दिले.

ढोकी : बिनविरोध निवडुण आलेल्या ढोकी ग्रामपंचायत सदस्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची दि. १८ जानेवारी रोजी एमआयडीसीतील बी. ४४ लातूर संपर्क कार्यालयात भेट घेतली. या वेळी बिनविरोध निवडून आलेल्या ढोकी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्तात्रय शिंदे, अनिरुद्ध पाटील, हिम्मत शिंदे, जनक शिंदे, बिपिन पाटील, पांडुरंग श्ािंदे, राहुल शिंदे, शेषेराव श्ािंदे, ज्ञानेश्वर शिंदे, नानासाहेब गारुळे, ज्ञानेश्वर बोराडे, श्रीराम श्ािंदे,
अनिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

काटगाव : काटगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या श्री साईग्राम पॅनलच्या विजयी ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. विजयी झालेल्या अंजली बोबडे, दत्तात्रय गायकवाड, शोभाबाई बोराडे, गुणवंत सरवदे, शीतल कोरे, राधाबाई सुर्यवंशी, लक्ष्मीबाई सरवदे, परमेश्वर माळी, सुशिलाबाई बंडे या सर्व सदस्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी गोविंद बोराडे, श्रीमंत पाटील, संदीपान बोले, माणिक बोळे, गणिभाई पठाण, राजाभाऊ बोराडे, दयानंद हालकुडे, अर्जुन लोखंडे, परमेश्वर माचवे, बालाजी गायकवाड, काकासाहेब बंडे, रमेश पाटील, बाळासाहेब बंडे, सचिन सूर्यवंशी, नाना सुर्यवंशी, श्रीकृष्ण माचवे, केशव गायकवाड, अफसर शेख, अय्युब शेख, भाऊसाहेब कापसे, उत्तम घोलप, बळीराम गायकवाड, गोरख शिंदे, दत्तात्रय बोराडे, सदन बोराडे, मधुकर लोखंडे, नीलकंठ बोराडे, बाळू सरवदे, भागवत बंडे, ताजोद्दिन चाऊस, अंकुश बोळे, सादिक पठाण, गोविंद बोळे, शत्रूघ्न बोराडे यांच्यासह काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

भिसे वाघोली : भिसे वाघोली ग्रामपंचायत निवडणुकी विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी, शेतमजूर ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले. विजयी ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्वयंम वायाळ, लालासाहेब भिसे पाटील, बाळासाहेब मांदले, संभाजी वायाळ, संभाजी काळे, सत्यशीला पाखरे, विमलताई पाटील, ज्योती गाजभारकर, हमीद बालंगे, ललिता मांदले, दैवशाला मनसुरे या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्याचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाऊसाहेब भिसे पाटील, जयराम भिसे, मुस्तफा पठाण, अप्पासाहेब भिसे, मेहबूब सय्यद, सलीम पठाण, फारुख पठाण, अशोक बाकले, नशीब पठाण, खय्युम पठाण, मोसिन पठाण, दिलदार पठाण, अल्ताफ पठाण, दिलीप भिसे, शिवाजी भिसे, आस्लम पठाण, संतोष भिसे, शिवाजी महाराज भिसे, श्रीमंत वायाल, काकासाहेब भिसे, राजाभाऊ चव्हाण, शुभंम ढेकळे, कलीम शेख, सत्तार शेख, राम मोदी, जमिल शेख, समधान पवार, रमाकांत गाजभारकर, सुभाष भिसे, सरताज शेख, महेश शितोळे, नंदकुमार वायाळ, बाप्पासाहेब गायकवाड, बाळासाहेब वायाळ, बाळासाहेब नीलंगे यांच्यासह भिसे वाघोली ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या