22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख साखर कारखान्यात ऊसाच्या रसापासून थेट ईथेनॉल निर्मीती होणार

विकासरत्न विलासराव देशमुख साखर कारखान्यात ऊसाच्या रसापासून थेट ईथेनॉल निर्मीती होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : काळाची पावले ओळखून विकासरत्‍न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.येथे थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मीती करण्यात येणार आहे. याचा अधिकाधिक लाभ शेतकरी सभासदांना होणार आहे, असे सांगून या परिवारातील सर्वच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवली जातील आणि परंपरे प्रमाणे ऊसउत्पादक अधिकात अधिक भाव देतील अशी ग्वाही, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री, लातूर मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

लातूर तालुक्यातील विकासरत्‍न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.विलासनगर, ता.जि. लातूर चा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ-२०२०_२१ दिनांक ११ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री, लातूर मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख होते. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मांजरा परीवारातील साखर कारखाने शेतकऱ्यासाठी मंदिरच
या प्रसंगी बोलतांना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, या कारखान्याचा परिसर म्हणजे आपल्यासाठी पंढरपूर आहे. संप्रदायात ज्या प्रमाणे वारकरी असतात त्याच प्रमाणे सहकाराच्या या मंदिरात शेतकरी भक्तीभावाने येतात. येथे आल्या नंतर आपल्या सर्वांनाच एक प्रकारे प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती मिळते. यातून आपल्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. हे सर्व घडण्यामागे मांजरेश्वराची कृपा आदरणीय विलासराव देशमुख यांनी दिलेला विचार कारणीभूत आहे. आपण सर्वजण या विचारामूळेच एकत्रित बांधले गेलेलो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

लातूर आणी परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत या भावनेतून आदरणीय विलसराव देशमुख यांच्या पुढाकारातून ३४ वर्षापूर्वी या कारखान्याची उभारणी झाली भावना चोगली असल्यामुळेच एकाचे दोन आणि दोनाचे चार अशी कारखान्याची साखळी आता निर्माण झाली आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख यांची शिस्त आणी नियोजनातून हा परिवार विस्तारत गेला आहे. स्वर्गीय ॲड. बब्रुवाहन काळे तसेच भिसे, सुर्यवंशी यांच्यासह तत्कालीन संचालकाचेही यात मोलाचे योगदान राहिले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

प्रयोगशील कर्मचारी, अधिकाऱ्यासाठीही प्रोत्साहन योजना
मांजरा परीवारातील सर्वच कारखाने आता उत्तम चालत आहेत. येथे नेहमीच नवे नवे प्रयोग होत राहतात. या प्रयोगातून तयार झालेले तंत्रज्ञानाची देवाण घेवणाही होत राहते. त्यामूळेच हे कारखाने कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त वापर, जास्तीत जास्त साखर ऊतारा आणी आर्थीक व्यवस्थापनात सर्वात पूढे आहेत असे सांगून ऊसउत्पादक शेतकरी आणि वाहतुक ठेकेदारात ज्या पध्दतीची स्पर्धा निर्माण करण्यात आली आहे त्याच पध्दतीने उत्कृष्ट कर्मचारी, अधिकारी यांनाही प्रोत्साहन देण्यात यावे त्याचा गौरव करण्यात यावा अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. या परीवारातील गणवत्तेची साखळी अधिक मजबुत करून शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक भाव मिळावा तसेच कामगार, कर्मचारी यांनाही अधिकची पगार व बोनस हे लाभ मिळावेत असे त्यांनी म्हटले.

कारखाना ऑफ सिजनमध्ये वैदयकीय उपकरणाची निर्मीती व्हावी
मांजरा परीवारातील साखर कारखान्यात काळाची गरज ओळखुन नवे नवे प्रयेाग राबविण्यात आले. उपपदार्थ निर्मीतीला प्राधान्य देण्यात आले. त्यामूळे हे कारखाने आज सुस्थितीत आहेत. कोविड संकटाच्या काळात आपण सॅनिटायझरची निर्मीती केली. ही गोष्ट जनतेसाठी आणी कारखान्यासाठीही फायदयाची ठरली त्यामूळे भविष्य काळात या कारखान्यानी वैदयकीय उपकरणनिर्मीती तसेच इतर साहित्याच्या निर्मीतीचेही प्रयोग करणे उपयुक्त ठरणार आहेत. कारखाना ऑफसिझनमध्ये अशी उत्पादने तयार करणे योग्य ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.

संत शिरोमणी मारूती महाराज कारखाना सभासदाचा विश्वास सार्थ ठरवू
मांजरा परीवारात संत शिरोमणी हा कारखाना पूर्वी पासूनच होता मात्र मध्सत्तरी काही काळ तेथे अडचणी निर्माण झाल्या आता शेतकरी सभासदांनी माठया विश्वासाने हा कारखाना पून्हा या परीवराकडे सुपूर्द केला आहे. त्याचा विश्वास सार्थ ठरावा या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे. राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने या कारखान्याना थकहमी मंजूर केली आहे. शिवाय आदरणीय दिलीपराव देश्रमुख यांच्या पूढाकारातून जिल्हा बॅकेनेही सहकार्य करायचे ठरवले आहे. त्यामूळे या हंगामात आता हा साखर कारखाना सुरू होत आहे. आगामी वर्षात तो अधिक चांगल्या पध्दतीने चालून स्पर्धेत पूढे येईल असा विश्वास पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

आघाडी सरकारकडून जनतेच्या हिताला प्राधान्य
महाराष्ट्रातील आघाडी सरकार जनतेच्या हिताला प्राधान्य देत काम करीत असुन निवडणूक पुर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. निवडणुक जाहिरनाम्यात काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आघाडी सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून मंत्रीमंडळाने कर्जमाफीचा निर्णय घेऊन तो तातडीने राबविला आहे. आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात राज्यसरकार आपदग्रस्थाच्या मदतीला धावून आले असून तातडीने १० हजार कोटीची मदत जाहीर केली आहे. लवकरच त्याचे वाटप सूरू होणार आहे.

सरकार सत्तेवर आल्यानंतर कोविड१९ महामारीचे संकट समोर आले. या संकटाचा सामना या सरकारने यशस्वीपणे केला आहे. जनतेला उपचाराच्या सुविधा पुरवीत असतांना त्यांना धान्य वाटपा पासून सर्व सुविधा सरकारने पुरवल्या आहेत. हे संकट येण्यापूर्वी कोरोना सारख्या रोगाची तपासणी करण्यासाठी फक्त तीन प्रयेागशाळा होत्या आता पर्यंत पाचशे पेक्षा अधिक प्रयेागशाळा राज्यात उभा राहिल्या आहेत त्यमूळेच ही साथ आटोक्यात येत आहे. आज हे संकट टळले आहे असे वाटत असले तरी या परिस्थितीत थोडाही निष्काळजीपणा घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामूळे जनतेने सावध रहावे सर्व प्रकारची काळजी घ्यावी, सुचनाचे तंतोतंत पालन करावे, मास्क सॅनीटायझरचा वापर अनिवार्यपणे करीत रहावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे. लस येऊन शेवटचा रूग्ण दुरूस्त होई पर्यत ही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कारखाना व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे यांनी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना माध्यमातून होणाऱ्या कामाची माहिती दिली. शेवटी ना.अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थितांना तसेच लातूर जिल्हावासियानी कोरोना पासून आपण अं आपले कुटुंबीयांना दूर ठेवा काळजी घ्या असे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी रेणाचे आबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे,एस.आर.देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी बकऱ्या चोरल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या