लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतिस्थळावर देशमुख कुटुंबीयांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाभळगाव येथील स्मृतिस्थळावर होणारा सामुदायिक आदरांजली कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला. शुक्रवारी सकाळी देशमुख कुटुंबीयांतील श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.
या कौटुंबिक आंदराजली कार्यक्रमानंतर माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक एस. आर. देशमुख, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संचालक संभाजी सूळ, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, संचालक प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, वसंत पाटील, प्रकाश देशमुख, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, महादेव मुळे, अभय साळुंके, शिवाजी कांबळे, प्रा. प्रवीण कांबळे यांच्यासह देशमुख कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते.
आरबीआय केंद्राला देणार ५७ हजार कोटींचा सरप्लस