27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरविलासराव देशमुख क्रिकेट क्लबचा विजयी षटकार

विलासराव देशमुख क्रिकेट क्लबचा विजयी षटकार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेमध्ये लातूर तालुक्यातून ४२ सामने खेळले गेले. या स्पर्धक सामन्यातून दोन टीम अंतिम सामन्यासाठी निवडल्या गेल्या. यात विलासराव देशमुख क्रिकेट क्लब बाभळगाव व डी. जे. क्रिकेट क्लब बाभळगाव हे दोन स्पर्धक संघ अंतिम फेरीत दाखल झाले. या दोन्ही संघात शनीवारी सायंकाळी ४ वाजता सामन्यास सुरुवात झाली. विलासराव देशमुख क्रिकेट क्लब संघ बाभळगाव या संघाने नाणेफेक ंिजकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामण्यास रोमहर्षक सुरुवात करून विलासराव देशमुख क्रिकेट क्लब संघाने १३४ धावाचे आवाहन उभे केले. १३४ धावांचा पाठलाग करत असताना डी. जे. संघाची दमछाक झाली. १०५ धावात सर्वबाद अशी दयनीय अवस्था डी. जे. संघाची झाली. विलासराव देशमुख क्रिकेट क्लब संघ बाभळगाव या संघाने विजयी होत लातूर तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर आपले नाव aकोरले. प्रथम येणा-या विलासराव देशमुख क्रिकेट क्लब संघ बाभळगाव यांना व द्वितीय येणा-या डी. जे. संघ बाभळगाव यांना अनुक्रमे ५१ हजार व द्वितीय येणा-या डी. जे. संघास ३१ हजार रूपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून साखर महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आबासाहेब पाटील सेलुकर, काँग्रेस कमिटी लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर जिल्हा बँकचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, काँग्रेस मीडिया सेल लातूरचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, दयानंद शिक्षण संस्था बाभळगावचे सचिव शाम देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे माजी उपसभापती मनोज पाटील, काँग्रेस लातूर जिल्हा समन्वयक सचिन दाताळ, प्रवीण पाटील चेअरमन निराधार कमिटी लातूर ग्रामीण, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, सहदेव मसके, संचालक कैलास पाटील, बाभळगावचे पोलीस पाटील मुक्ताराम पिटले, बाभळगावचे सरपंच सचिन मस्के, बाभळगावचे उपसरपंच गोविंदराव देशमुख, माजी उपसरपंच अविनाश देशमुख, पंच दीपक जाधव, पंच गोपाळ थडकर, पंच प्रकाश आयरेकर यानी चांगले काम पाहिले. भातांगळी सर्कल प्रमुख बालाजी वाघमारे, क्रिकेट खेळाडू राहुल गरड व हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या