लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सिजन सेंटर व व्हेंटीलेटर सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे़ आतापर्यंत अनेक रुग्ण या सेंटरमधून बरे होऊन आपापल्या घरी पोहंचले आहेत़ लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०८ असली तरी उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या २२५ इतकी आहे़ सध्या १७० रुग्ण उपचार घेत असून २० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दि. ३ जुलैपर्यंत लातूर शहरात १४७, लातूर ग्रामीणमध्ये २६, अहमदपूर २३, निलंगा ग्रामीण २०, निलंगा शहर १०, उदगीर ग्रामीण ३०, उदगीर शहर ९१, रेणापूर ४, चाकुर ४, जळकोट २, औसा शहर १४, औसा ग्रामीण ३७ असे एकुण ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत़ तर लातूर शहरातील ६१, लातूर ग्रामीणमधील १८, अहमदपूर ११, निलंगा ग्रामीण ३, निलंगा शहर २, उदगीर ग्रामीण १, उदगीर शहर २३, रेणापूर २, चाकुर ३, जळकोट ००, औसा शहर ५, औसा ग्रामीण ४१ असे एकुण १७० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत़ उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांमध्ये लातूर शहर ७४, लातूर ग्रामीण ५, अहमदपूर ९, निलंगा ग्रामीण १७, निलंगा शहर ८, उदगीर ग्रामीण २९, उदगीर शहर ७४, रेणापूर २, चाकुर १, जळकोट २, औसा शहर ४, औसा ग्रामीण ०० असे एकुण २२५ रुग्णांचा समावेश आहे़ मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये लातूर शहरातील ४, अहमदपूर २, निलंगा ग्रामीण १, उदगीर ग्रामीण १, उदगीर शहर ६, जळकोट १, औसा शहर ४ तर औसा ग्रामीणमधील १ असे २० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, महानगरपालिका प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहेत़ तीन महिन्यांपुर्वी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागायचे़ त्यानंतर सोलापूरला स्वबॅची तपासणी करण्यात यायची़ यात वेळ खुप जायचा़ स्वॅबचा अहवाल यायला उशिरा होत असे़ यात रुग्णावर उपचार करायलाही उशिरच व्हायचा.
ही बाब लक्षात घेवून उपचार राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतच स्वॅब तपासणीची अत्याधुनिक लॅब मंजूर करुन तात्काळ ती कार्यान्वीत केली़ परिणामी काहीं तासांत स्वॅबचा अहवाल प्राप्त होऊन रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याची सुविधा निर्माण झाली़ त्यामुळे कोरोनाबाधित अनेक रुग्णांचे प्राण वाचविता आले.
ऑक्सिजन सेंटरमध्ये ३६० तर व्हेंटीलेटर सेंटरमध्ये २० बेड
कोरोनाबाधित रुग्णांवर आॅक्सिजन सेंटर व व्हेंटीलेटर सेंटरमधील उपचार जीवनदायी ठरत आहेत़ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ६०, या संस्थेचअंतर्गत असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३०० असे एकुण ३६० आॅक्सिजन बेड तर २० व्हेंटीलेटर बेडची सुविधा उपलब्ध आहे़ या संस्थेत आजघडीला एकुण ६६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यातील २३ रुग्ण ऑक्सिजन सेंटरमध्ये, ५ व्हेंटीलेटर सेंटरमध्ये तर २८ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत़ या रुग्णांच्या उपचारार्थ चार-चार तासांच्या शिफटमध्ये एक डॉक्टर दोन नर्स २४ तास कार्यरत असल्याची माहिती या संस्थेतच्या कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ़ रामराव मुंडे यांनी दिली.
Read More घातक अपाचे, मिग २९ प्रहार करण्यासाठी सज्ज