29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सीजन टॅंक सुरक्षित

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सीजन टॅंक सुरक्षित

एकमत ऑनलाईन

लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टॅन्कची सुरक्षिता तातडीने तपासून घ्यावी अशी सूचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज यांना केली होती. त्यानुसार सदरील टँकची तज्ञांकडून तपासणी करून घेण्यात आले असून त्यांनी ते सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे.

नाशिक येथील दुर्दैवी घटनेनंतर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ऑक्सिजन यांची तातडीने सुरक्षितता तपासून घ्यावी अशी सूचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज यांच्याकडे केली होती. या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांना तातडीने सदरील टॅंकची तपासणी करून घेण्यासंदर्भात कळवले होते. ऑक्सीजन तज्ञ टीम व संबंधित वरिष्ठ डॉक्टर यांच्यामार्फत आज लगेच त्यांची पूर्ण तपासणी करून घेतली, या तपासणीनुसार सदरील टॅंक सुरक्षित असल्याचा अहवाल तज्ञ टीमने दिला आहे.

ऑक्सिजनही पोचला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरात नुकत्याच उभारण्यात आलेल्या या ऑक्सिजन टँकची साठवण क्षमता मोठी असून आज दुपारी लिक्विड ऑक्सीजन चा टँकर लातूर मध्ये पोहोचला असून या टॅंकमध्ये सदरील ऑक्सिजन भरून घेण्यात आला आहे. त्यामुळे लातुरात या सर्वात मोठ्या कोविड हॉस्पिटलची आगामी काही दिवस ऑक्सिजन पुरवठा बाबतची चिंता कमी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७२ व्यक्ती कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या