32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूरविलासराव देशमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम

विलासराव देशमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम

एकमत ऑनलाईन

लातूर :  मांजरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित लातूर तालुक्यातील सावरगाव येथील विलासराव देशमुख विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च-२०२० चा निकाल ९८.६६ टक्के लागला आहे. विद्यालयातून ९७.८० टक्के गुण घेऊन साक्षी अनंत मस्के प्रथम, ९६.०० टक्के गुण घेऊन विद्या रामु गायकवाड द्वितीय तर कांचन बाळासाहेब अडसुळे ९५.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

तसेच विशेष प्राविण्यामध्ये ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी मेनकुदळे सायली बाळासाहेब ९३.६० टक्के, जाधव महेश शंकर ९१.४० टक्के, साखरे गायत्री माधव ९१.४० टक्के, जाधव रोहित विजय ९१.०० टक्के, मोरे अमृता उमाकांत ९०.४० टक्के, अडसुळे मनोज सुधाकर ८९.८० टक्के, टेकाळे अश्विनी धनंजय ८८.२० टक्के, मोरे अर्पिता प्रविण ८७.६० टक्के, झेटे श्रद्धा श्रीधर ८७.२० टक्के, शिंदे ज्ञानेश्वर नेताजी ८६.८० टक्के, शिंदे रोहन दत्ता ८६.४० टक्के, भोंग शितल राम ८६.०० टक्के, सुरवसे प्रतिभा प्रकाश ८५.६० टक्के, माने संभाजी तुकाराम ८५.४० टक्के, माने प्रसाद जगन्नाथ ८५.२० टक्के, अडसुळे वर्षाराणी कमलाकर ८५.२० टक्के, घाटुळे सौरभ अनंत ८५.०० टक्के, माने प्रणव हणमंत ८५.०० टक्के तसेच प्रथम श्रेणी मध्ये २२ तर द्वितीय श्रेणीमध्ये ८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन करुन निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, मुख्याध्यापक शिवराज म्हेत्रे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read More  भाजपचे जिल्ह्यात उद्या रास्तारोको आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या