38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeलातूरराजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याचा विचार विलासरावजींनी दिला

राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याचा विचार विलासरावजींनी दिला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राजकारणाचा खरा उपयोग समाजाच्या विकासासाठी करण्याचा विचार विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दिला. त्या विचाराचे पाईक होवून आम्ही कार्यरत असून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील गूळ मार्केट शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २४ मे रोजी सायंकाळी झाले. त्यानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित देखण्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, अभय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकारणात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनसामान्यांचे जीवन सुखकर व्हावे, यासाठी कार्य करावे आणि राजकारणाचा मूलभूत हेतू साध्य करावा, असे नमूद करून माजी मंत्री सहकार महर्षी पुढे म्हणाले की, विकासरत्न विलासराव देशमुख यांनी जनसामान्यांचे जगणे सुस करण्यासाठी असंख्य निर्णय घेतले. घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच मांजरा नदीवर बराजची शृंखला उभी राहिली. आज मांजरा नदीचे १४५ किलो मीटर पात्र जलमय झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विमानतळ आणि ब्रॉडगेज रेल्वेचे रुळ अंथरण्याचे काम देशात सर्वप्रथम लातूरला झाले. ते विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या निर्णयामुळेच झाले. कोणीही मागणी न करता विलासरावजींनी लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले. त्यांनी विविध क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात केला. लातूर जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ विलासरावजींनी रोवली. आज जिल्ह्यात सहकाराचे जाळे निर्माण झाले आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा वसा घेवून आम्ही पुढे जात आहोत. प्रत्येकाने कर्तव्याप्रती जागरुक असले पाहिजे, असेही सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले.

सुंदर असा कार्यक्रम सुरू असताना वरुणराजाने हजेरी लावली. पाऊस सुरु झाला. पावसातच आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दमदार वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेच्या गूळ मार्केट शाखेची नूतन इमारत दिमाखदार झाल्याचे ते म्हणाले. पावसामुळे त्यांना मनोगत आटोपते घ्यावे लागले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिलखुलास, खुमासदार भाषणे केली. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० शाखांचे व्यवस्थापक, वसुलीचा इष्टांक पूर्ण करणारे पाच फिल्ड ऑफिसर, शाखा तपासणीस यांच्यासह चाकूर, जळकोट, अहमदपूर, उदगीर, रेणापूर आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक बँकेच्या संचालिका सपना किसवे यांनी केले. कार्यक्रमास धनंजय देशमुख, सतीश पाटील, रविंद्र काळे, अ‍ॅड. समद पटेल, विजय देशमुख, संजय निलेगांवकर, शिवाजी कांबळे, प्रिती चंद्रशेखर भोसले, ज्योती पवार, बँकेचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाट, अशोक गोविंदपूरकर, राजकुमार पाटील, एन. आर. पाटील, अनुप शेळके यांनी केले. सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील यांनी मानले..

जिल्हा सहकारी बँक असली तरी राष्ट्रीयीकृत बँकांच्या दरानेच कर्ज पुरवठा

४० वर्षांपूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी ११ कोटी होत्या. आज साडेसात हजार कोटी ठेवींची उलाढाल आहे. हे सर्व विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे झाले, असे नमूद करुन जिल्हा बँकेचे चेअमन आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा बँक ही सहकारी बँक असली तरी बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या दरानेच कर्ज पुरवठा केला आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या गूळ मार्केट शाखेची इमारत अतिशय देखणी झाली आहे. बँकेच्या योजना चांगल्या प्रकारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळेच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला.जिल्हा बँक प्रत्येक घटकाला अर्थपुरवठा करीत आहे. विक्रमी कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकरी प्रचंड कष्ट करुन जिल्ह्याचे अर्थकारण बदलत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात सहाय्य करण्यात आले. रोजगार निर्मितीसाठी बँकेने एक पाऊल पुढे टाकत आर्थिक दुर्बलांना सक्षम केले. १०० हार्वेस्टरचे वितरण करुन ४ हजार नवीन रोजगार आणि १०० नवीन करोडपती उद्योजक उभे केले, असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या