22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरनारळांच्या झाडांनी लातूर जिल्ह्यातील गावे गजबजणार

नारळांच्या झाडांनी लातूर जिल्ह्यातील गावे गजबजणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने वृक्ष लागवड, मियावॉकी पध्दतीने वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न प्रमाणे वृक्ष लागवड या मोहिमा प्रत्येक गामपंचायतीत सुरू असतानाच आता जिल्हयात १ लाख ५० हजार नारळांच्या झाडांची लागवड प्रत्येक गावात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात नारळांच्या झाडे पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या झाडांचे बिहार पॅटर्न प्रमाणे संगोपण होणार आहे. नारळाचे झाड जगण्याचे प्रमाणाही वाढणार आहे.

लातूर जिल्हयातील १० पंचायत समितींच्या अंतर्गत असलेल्या ७८६ ग्रामपंचायतीमध्ये १ लाख ५० हजार हजार नारळांच्या झाडांची लगवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात किमान १५ हजार नारळांची शाळेच्या इमारती लगत, ग्रामपंचायती लगत, रस्त्याच्या दुतर्फा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, नागरीकांच्या घराच्या जवळ नारळांच्या झाडांची लागवड होणार आहे. त्यामुळे येणा-या काळात प्रत्येक गावात नारळांच्या झाडांची संख्या मोठया प्रमाणात पहायला मिळणार आहे. तसेच पर्यावरण संतूलनाच्या बरोबरच मानवी आरोग्यसाठी नारळाचे पाणीही सहज उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींना नियमित वृक्ष लागवडीचे उदिष्ट दिले आहे. तसेच मियावॉकी पध्दतीने वृक्षांची लागवड या बरोरच बिहार पॅटर्न प्रमाणे वृक्षांचे संगोपण करून वृक्षांचे संगोपण केले जात आहे. या बरोबरच जिल्हयात १ लाख ५० हजारापेक्षा जास्त नारळांच्या झाडांची लागवड होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या