34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरलातूर शहरात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन

लातूर शहरात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिका, उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिका हद्दीत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. ३ मार्च रोजी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागु केली. हे ज्ञात असतानाही रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करण्याचे काही प्रकार मंगळवारी रात्री घडले. पोलिसांनी गस्त घालून धरपकड केली आणि अशा लोकांवर गुन्हेही दाखल केले.

लातूर-औसा रोडवर हॉटेल किल्लाकरीकर हा ढाबा आहे. मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी असतानासुद्धा हा ढाबा रात्री उशिरापर्यंत चालु होता. ढाबा चालकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी जमवून हॉटेल चालु ठेवले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून ढाबा चालक दिगंबर दगडू नेलवाडे रा. महादेवनगर लातूर याच्या विरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत विनाकारण रस्त्यावर फिरण्यास बंदी असतानाही औसा रोडवर नंदी स्टॉप परिसरात लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या वेळी एक दुचाकी चालक रात्री उशिरा जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्या दुचाकीचालकास तिथे थांबविण्याचा इशारा करुन ही तो न थांबता निघून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन दुचाकीचालकास रोखले. पोलिसांनी एम. एच. २४-एए-७८०६ या क्रमांकाचा दुचाकी चालक आदित्य जगदीश माने रा. राजीव गांधी चौक, लातूर याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन व विनापरवाना वाहन चालवणे या कारणावरुन त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांना ५० व्यक्तींची मर्यादा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासनाच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनितीक आदी प्रकारच्या कार्यक्रम आयोजनास ५० व्यक्तीसंख्येची मर्यादा निश्चित केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कार्यवाही केली जाणार आहे.

सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक कार्यक्रमामध्ये रुढी, परंपरेनूसार फक्त आवश्यक विधी पार पाडण्यात यावेत. यामध्ये कमाल व्यक्तीसंख्येची मर्यादाा ५० एवढी असेल. कोणत्याही परिस्थितीत विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तीसंख्या वाढणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग प्िरतबंधक कायदा १८९७ अन्वये दिलेल्या तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नूसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० च्या तरतूदीनूसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

माळढोक अभयारण्य नावालाच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या